खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज आला पण एटीएममधून कॅश आलीच नाही; अशा वेळी काय करायचं? जाणून घ्या सविस्तर…

ATM मधून कॅश काढताना मोबईलवर खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज आला खरा पण मशीनमधून कॅश मात्र बाहेर आलीच नाही.

ATM

ATM

Money deducted from account, but no cash dispensed from ATM what should you do Find out the details : आजकाल आपण व्यवहार करताना बहुतांश वेळा तो युपीआयने म्हणजेच ऑनलाईन करतो. मात्र जेव्हा कधी कॅश द्यायची वेळ येते तेव्हा एटीएममधून ती काझावी लागते. अशा वेळी आपल्यापैकी अनेकांनी एका समस्येचा सामना केला असेल. ती म्हणजे एटीएममधून कॅश काढताना मोबईलवर खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज आला खरा पण मशीनमधून कॅश मात्र बाहेर आलीच नाही. अशा वेळी आपण घाबरतो. त्यात रक्कम मोठी असेल तर पाया खालची जमीनच सरकते. काय कारावं कुणाला, वाचारावं खात्यावर पैसे परत येतील का? अशा एकना अनेक चिंतांनी डोकं भांडावून जातं मात्र आता घाबरून जाऊ नका. कारण असं तुमच्यासोबत झालं तर काय कारायचं हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे…

Justice Yashwant Varma : कट रचल्याचे पुरावे नाही; माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध

याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने नवे नियम तयार केले आहेत. त्यानुसार एटीएममधून कॅश काढताना मोबईलवर खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज आला पण मशीनमधून कॅश मात्र बाहेर आलीच नाही. तर बँकेला निर्धारित वेळेमध्ये ग्राहकाचे पैसे परत करावे लागतात.

IPL 2027: हार्दिक पंड्याच्या ट्रेडची चर्चा; गुजरात टायटन्सकडे ठेवली होती कर्णधारपदाची अट?

हा झाला नियम पण असं तुमच्यासोबत झालं तर नेमकं काय करायचं तर सर्वांत आधी ट्रान्झॅक्शनची सर्व माहिती सुरक्षित ठेवा जसे की, एटीएममधून मिळणारी स्लिप जर अशी काही स्लिप मिळाली नसेल तर मोबाईलवर आलेला खात्यातील पैसे कट झाल्याचा मेसेज किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा स्क्रीनशॉट निघत नसल्यास त्याचा दुसऱ्या फोनवर त्याचबरोबर त्याचा रेफरन्स नंबर, वेळ आणि एटीएम लोकेशम देखील जपून ठेवा. या सर्व गोष्टी बँकेत तक्रार करताना पुरावा म्हणून कामं येतात. काही लोक एटीएममधून लगेच बाहेर येतात आणि त्यांच्याकडे फेल झालेल्या ट्रान्झॅक्शनची काही माहिती राहत नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे सर्व माहिती सुरक्षित ठेवा.

इम्रान खान कदाचित जिवंत नसतील? पाकिस्तानी पत्रकाराचा मोठा दावा

त्यानंतर तात्काळ तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर हेल्पलाइन नंबरवर कॉल करा. जो तुमच्या एटीएम कार्डच्या मागे दिलेला असतो. त्यावर तुमची तक्रार नोंदवा बँकेकडून तुम्हाला एक तक्रार नंबर किंवा तिकीट नंबर दिला जातो. तो नोंदवून ठेवा, कारण पुढे त्याची गरज पडू शकते. अनेक प्रकरणांमध्ये सिस्टीम स्वतः फेल ट्रांजेक्शन ओळखते आणि काही तासात किंवा 24 तासांच्या तुमचे पैसे परत खात्यावर जमा केले जातात. मात्र असं झालं नाही तर तक्रार नंबरचे आधारे सातत्याने हॅलो घेणे गरजेचे असतं. अशा प्रकारे फॉलोअप घेतल्यानंतर हे पैसे जवळपास दिवसाच्या आत रिफंड होणे गरजेचे असते. असा आरबीआयचा नियम आहे.

उजनीमार्गे 40 टीएमसी महापुराचं पाणी मराठवाड्याकडं वळवणार; मुख्यमंत्री फडणवीसांची योजना काय?

मात्र असं देखील झालं नाही तर बँकेच्या शाखेत जाऊन लेखी तक्रार द्या. त्याची रिसिप्ट तुमच्याजवळ ठेवा. गरज पडल्यास ब्रँच मॅनेजरशी थेट संवाद साधा. कारण अनेक प्रकरणामध्ये असे पैसे न मिळाल्यास ग्राहकांना व्याज किंवा नुकसान भरपाई दिली जाऊ शकते. तसेच आरबीआयच्या नियमांनुसार निर्धारित वेळेत बँकेने पैसे परत न दिल्यास बँकेला दंड देखील होऊ शकतो.

बिबट्याचे वाढते हल्ले… आमदार तांबेनी वनमंत्र्यांनी भेट घेत केली महत्वाची मागणी

तसेच याही पुढे जाऊन बँकेने पैसे परत न दिल्यास ग्राहक बँकिंग लोकपाल किंवा थेट आरबीआयच्या पोर्टलवर थेट तक्रार करू शकतो. तसेच आजकाल डिजीटल बँकिंग वाढल्याने अशा प्रकारांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे ग्राहकांनी जागरूक राहणं गरजेच आहे. एटीएमचा वापर करताना सावधान राहा सुरक्षित मशीन निवडा तसेच ट्रॅन्झॅक्शन पुर्ण होई पर्यंत स्क्रिनवर नजर ठेवा. कारण योग्य माहिती आणि योग्य वेली केलेली तक्रार तुमचा पैसा सुरक्षित परत मिळू शकतो.

Exit mobile version