MPSC Exam Update: MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एमपीएससीने (Maharashtra Public Service Commission) पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. 6 जून रोजी घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ( MPSC Pre-Examination) आता 21 जुलै रोजी होणार आहे. एमपीएससीने अधिकृत ट्वीटर हॅंडलवर याबाबतची माहिती दिली आहे.
LokSabha Election मध्ये भाजपचा विजय अन् गुंतवणुकदार मालामाल; ‘हे’ शेअर्स वधारणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली जाते. वर्ग 1 आणि वर्ग 1 मधील एकूण 524 पदांसाठी ही परिक्षा घेतली जाणार होती. मात्र, ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना या परिक्षेसाठी ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती सातत्याने करण्यात येत होती. अखेर एमपीएसीने ही विनंती मान्य केली. त्यामुळं या पूर्व परीक्षेची तारीख आयोगाकडून पुढं ढकलण्यात आली आहे.
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) May 30, 2024
Danka Hari Namacha : ‘डंका… हरी नामाचा’ चित्रपटात ‘या’ नामवंत कलाकारांची मांदियाळी
काही उमेदवारांनी त्यांच्या कडील कुणबी नोदींच्या आधारे इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे नमूद करून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 साठी इतर मागास वर्गाचा विकल्प सादर करण्यचाची विनंती केली होती. त्या अनुसरून शासनाने एक पत्रक जारी केलं. (शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण 2024/प्र. क्र. 137/ आऱक्षण -05, दिनांक 28 मे 2024) त्या अनुसार, दिलेल्या सूचना विचारात घेण्यात आल्या. आणि अराखीव किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास अशा उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्याची निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, एमपीएसीने घेतलेल्या या निर्णयामुळं महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परिक्षा -2024 ही सुधारित तारखेला म्हणजेच 6 जुलै 2024 ऐवजी 21 जुलै 2024 रोजी घेतली जाईल.