Download App

नाबार्डमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला १ लाख रुपये मिळणार पगार, कोण करू शकतं अर्ज?

  • Written By: Last Updated:

Nabard Job 2024: आज अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job)शोधात आहेत. मात्र, या स्पर्धेच्या काळात सरकारी नोकरी मिळवणं हे मोठं आव्हान आहे. दरम्यान, तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे, नुकतीचे नाबार्डने (NABARD ) भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती संशोधन अधिकारी (Research Officer) पदासाठी असेल. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन पध्दतीने अर्ज करू शकतात. या अर्जाची अंतिम तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

Israel attack on Gaza : गाझावर इस्त्रायलचे पुन्हा हल्ले, राफा शहरातवर केलेल्या हल्ल्यात 18 ठार 

या भरती प्रक्रियेसाठी, उमेदवारांना मुलाखतीसह अनेक परीक्षा द्याव्या लागणार आहे.
नाबार्डसाठी ही भरती खालील गोष्टींच्या आधारे केली जाणार आहे.
– लेखी पात्रता परीक्षा
– डेटा विश्लेषण
– व्हिज्युअलायझेशन मूल्यांकन
– पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन
– मुलाखत

पात्रता –
संशोधन अधिकारी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे.

वयोमर्यादा आणि पगार
नाबार्डसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 31 मार्च 2024 रोजी 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील अर्जदारांना वयात सवलत दिली जाईल. संशोधन अधिकारी पदासाठी निवड झाल्यास उमेदवारांना 1,00,000/- रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

या पदभरतीसाठी अर्ज करायला आता अवघेच काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उमेदवारांनी वेळ न दवडता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत

नाबार्डची अधिकृत वेबसाइट: nabard.org

अधिसूचना:
https://www.nabard.org/auth/writereaddata/CareerNotices/1504240609ro-advertisement-with-application-form-for-bird-website-dit.pdf

महत्वाचं असं की, अर्ज भरतांना भरतांनी आधी अधिसुचना वाचावी. त्यानंतरच अर्ज करावा. कारण, अर्जात काही चुका राहिल्यास किंवा अपुरी माहिती भरल्यास अर्ज नाकारल्या जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

follow us

वेब स्टोरीज