Download App

Navratri 2023 : …म्हणून माहूरच्या रेणुकेची तांदळारूपातल्या मुखाचीच पुजा केली जाते

Navratri 2023 : नवरात्रौत्सवानिमित्त (Navratri 2023) आपण जाणून घेत आहोत देवीच्या साडेतीन शक्तीपीठांच्या अख्यायिका आणि महती. त्यामध्ये आज आपण देवीच्या तिसऱ्या पुर्ण पीठाबद्दल जाणून घेणार आहोत. कोल्हापूरची महालक्ष्मी, त्यानंतर तुळजापूरची तुळजाभवानी त्यानंतर साडेतीन शक्तीपीठांमध्ये तिसरं पुर्ण पीठ आहे ते म्हणजे माहूरची रेणुका देवी. काय आहे या देवीची अख्यायिका आणि महती पाहूयात…

Ahmednagar Accident : भीषण अपघात! करंजी घाटात ट्रक-टँकरची समोरा समोर धडक…

नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणी डोंगरमाथ्यावर या देवीचं मंदीर वसलेलं आहे. असे म्हणतात की हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजाने बांधले होते. डोंगरावर असलेले हे मंदीर टेकडी प्रकारातील किल्ला आहे. ज्याला रामगड किल्ला म्हणूनही ओळखळं जातं. येथे काही कोरीव कामे केलेल्या गुहा आहेत. त्याचबरोबर रेणुका माता ही भगवान परशुराम यांची आई आहे. त्यामुळे या डोंगरावर देवीसह परशुराम, दत्तात्रय, अनुसया माता, कालिकामाता यांची देखील मंदीरं आहेत. येथील भक्त हे मानतात की, भगवान दत्तात्रेय येथे जन्मले होते.

संजय राऊत सुप्रीम कोर्ट आहे का ? नार्वेकरांचं राऊतांना खोचक उत्तर

तर या देवीची अख्यायिका सांगितली जाते की, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचं रेणू असं होतं. नंतर या रेणूचं लग्न शंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या जमदग्नी ऋषी यांच्याशी झाले. जमदग्नी ऋषी आश्रमात शिष्यांना शिकवत. तर पुढे विष्णुचा सहावा अवतार असणाऱ्या भगवान परशुरामांचा जमदग्नी आणि रेणूच्या पोटी जन्म झाला. तो पराक्रमी होता. याच आश्रमात सर्व इच्छा पुर्ण करणारी कामधेनू गाय होती. ही गाय राजा सहस्त्रअर्जुनाने मागितली. पण ऋषींनी त्यांना दिली नाही. त्यावेळी परशुराम आश्रमात नाही याचा फायदा घेत सहस्त्रअर्जुनाने आश्रमावर हल्ला करत जमदग्नींना ठार करत कामधेनू पळवली.

‘त्यावेळी’ साहेब दोन तास प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसून होते : आव्हाडांनी सांगितला शरद पवारांचा निर्धार

परशुराम आश्रमात आल्यावर त्याने हा प्रकार पाहिला आणि क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. तसेच पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून कावडीमध्ये जमदग्नींचे पार्थिव व माता रेणुकेला बसवत रानोमाळ भटकत तो माहूरगडावर आला. येथे दत्तात्रयांनी त्याला भूमी दाखवली. तेथे परशुरामाने बाण मारून मातृतीर्थ आणि सर्वतीर्थ निर्माण केले. स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. दत्तात्रयांनी सर्व विधींचे पौरोहित्य केले. माता रेणुका देखील सती गेली.

मात्र परशुरामाला रेणुकेची आठवण येऊ लागली. तेव्हा एक आकाशवाणी झाली. त्यात सांगितले की, तुझी आई जमिनीतून वर येत तुला दर्शन देईल फक्त तु मागे पाहू नको. मात्र परशुरामाने मागे पाहिलेच. तेव्हा रेणुका मातेचा केवळ चेहराच जमीनीतून वर आला होता. त्यामुळे आजही रेणुका देवीची केवळ तांदळारूपातल्या मुखाचीच पुजा केली जाते. अशी या देवीची अख्यायिका सांगितली जाते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ‘मातापूर’ही म्हटले जाते तर शेजारच्या आंध्रप्रदेशात ‘ऊर’ म्हणजे गाव ते ‘ माऊर ‘ आणि पुढे ‘ माहूर ‘ झाले..!!

Tags

follow us