Download App

संजय राऊत सुप्रीम कोर्ट आहे का ? नार्वेकरांचं राऊतांना खोचक उत्तर

Rahul Narwekar : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात अजूनही निकाल आलेला नाही. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) निकाल देणार आहेत. त्यांच्याकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने केला जात आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याच मुद्द्यावर आज राहुल नार्वेकर यांच्यावर अत्यंत टोकाची टीका केली होती. त्यांच्या या टीकेला नार्वेकर यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. बिनबुडाचे आरोप फक्त निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकावा आणि आपल्याला पाहिजे तसं घडवून घ्यावं याच हेतूने केले जात आहेत. संजय राऊतांना स्वस्तात प्रसिद्धी करण्याची जुनी सवय आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींना उत्तर देऊन प्रोत्साहन न देणं हाच उत्तम मार्ग आहे, असे नार्वेकर म्हणाले.

‘त्यावेळी’ साहेब दोन तास प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसून होते : आव्हाडांनी सांगितला शरद पवारांचा निर्धार

ज्यांचं अस्तित्व असे लूज कॉमेंट करून टिकतं त्या व्यक्तींबद्दल का बोलावं. त्यांना कशाला महत्व द्यायचं. संजय राऊत सुप्रीम कोर्ट आहेत का?, संजय राऊत प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत का? असे खोचक सवाल करत त्यांनी केलेल्या वक्तव्यांकडं का लक्ष द्यावं? असे नार्वेकर म्हणाले. राऊतांना जर विधिमंडळातील नियम समजले असते तर त्यांनी असे वक्तव्य केलेच नसते. संजय राऊतांसारख्या व्यक्तींच्या वक्तव्यांना उत्तरे देऊन मी माझी गरिमा कमी करू इच्छित नाही, असेही नार्वेकर म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत ?

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि त्यांच्या संरक्षणाखाली सुरू असलेलं घटनाबाह्य सरकार हे संविधान विरोधी आहे. हे चोर आणि लफंगे यांचं सरकार चालवत आहेत. घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती त्यांना संरक्षण देत असेल तर या राज्यामध्ये काय चाललंय याची कल्पना न केलेली बरी. नार्वेकर सांगत आहेत विधिमंडळाचे अधिकार, सार्वभौमत्व याचा अर्थ असा नाही की, चोरी करून एखाद्याच्या घरात शिरावं आणि त्या घराच्या मालकाने चोराला आणि खुन्याला संरक्षण द्यावं अशी ही सार्वभौमत्वाची व्याख्या होत नाही.

Maharashtra Politics: ‘राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून…; संजय राऊतांनी डिवचले

शिवसेनेचे 40 आमदार मुख्यमंत्र्यांसह आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसह हे लूट करून दुसऱ्या घरात शिरलेले आहेत. या दरोडेखोरांना विधानसभा अध्यक्षांनी सार्वभौमत्वाच्या नावाखाली संरक्षण देत असतील तर मला वाटतं राहुल नार्वेकर यांचं नाव या अध्यक्ष पदावरून देशाच्या काळ्या कुट्ट इतिहासात लिहिलं गेलं जाणार आहे. उद्या ते खुर्चीवर नसतील तेव्हा अशा व्यक्तींना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल. सर्वोच्च न्यायालय शिक्षा सुनावतं पण फासावर लटकवण्यासाठी जल्हादाची गरज असते ही जबाबदारी आता विधानसभा अध्यक्षांवर आहे, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली होती.

Tags

follow us