‘त्यावेळी’ साहेब दोन तास प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसून होते : आव्हाडांनी सांगितला शरद पवारांचा निर्धार

‘त्यावेळी’ साहेब दोन तास प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसून होते : आव्हाडांनी सांगितला शरद पवारांचा निर्धार

मुंबई : शरद पवार यांची कोणत्याही पातळीवर जाऊन संघर्ष करण्याची तयारी आहे. निवडणूक आयोगातील सुनावणीवेळी ते वकिलाही पाठवू शकले असते. पण ते स्वतः गेले आणि दोन तास प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसून होते, अशी आठवण सांगत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा संघर्षाचा निर्धार असल्याचे सांगितले. ते लेट्सअपला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. (NCP (Sharad Pawar) MLA Jitendra Awhad said that NCP national president Sharad Pawar is determined to fight)

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार यांनी कोणत्याही पातळीवर जाऊन संघर्ष करण्याची तयारी केली आहे. खरं तर निवडणूक आयोगातील सुनावणीवेळी ते वकिलाला पाठवू शकले असते, पण ते स्वतः उपस्थित राहिले. ते म्हणाले, रिस्पॉडंट मी आहे, आणि माझं नाव शरद पवार आहे. कोणत्याही पातळीवर जाऊन संघर्ष करायची त्यांची मानसिकता आहे.

Maharashtra Politics: ‘राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून…; संजय राऊतांनी डिवचले

आम्हीच त्यावेळी शरद पवार यांना म्हणालो की साहेब तुम्ही जाण्याची गरज नाही, आम्ही जातोय. तर ते आमच्यावरच ओरडले. ते स्वतः सुनावणीसाठी उपस्थित राहिले. ते दोन तास प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसून होते. मी पुन्हा पुन्हा महाराष्ट्राला सांगतो की, शरद पवार यांनी पहिल्या दिवसांपासून ठरवले आहे की, संघर्ष करायचा आहे आणि लोकांमध्ये जायचं आहे. ते त्यांच्या भुमिकेपासून तसुभरही ढळत नाहीत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube