Download App

Paytm Crisis: विजय शेखर शर्मा! अब्जाधीश ते दिवाळखोरपर्यंतचा प्रवास

Paytm Banking Service : बाजारात गेलं की आपल्याला कानावर एकदातरी ‘पेटीएम करो’ (Paytm Crisis) असा आवाज पडतो. पण आरबीआयच्या दणक्याने हा आवाज कायमचा बंद होण्याची शक्यता आहे. सध्या पेटीएमची मालकी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स (One 97 Communications) कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झालीय. पण तुम्हाला माहिती आहे का पेटीएमची स्थापना कोणी केलीय? उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील इंग्रजी बोलायला संकोच वाटणाऱ्या एका हिंदी भाषिक तरुणाने सर्वात कमी वयाचा अब्जाधिश होण्याचा प्रवास कसा केला?

शिक्षण, संकट आणि संघर्ष
पेटीएमच्या संस्थापकाचे नाव आहे विजय शेखर शर्मा. बँकर आणि लेखक विनित बन्सल यांनी त्यांच्या ‘बिकॉज स्काय इज द लिमिट’ पुस्तकामध्ये त्यांच्याबद्दल आणि पेटीएमबाबत माहिती दिलीय. विजय शेखर यांचा 1978 ला उत्तर प्रदेशच्या अलीगढ जिल्ह्यात झाला. अवघ्या 14 वर्षी शर्मा 12 वी पास झाले. पण कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागली. इंजिनीअरिंग कॉलेजसाठी किमान वयोमर्यादा 15 वर्ष आवश्यक होती. 1994 मध्ये दिल्ली विद्यापीठानं स्पेशल केस म्हणून वय पूर्ण होण्याआधी त्यांना इंजिनीअरिंगला प्रवेश दिला.

शर्मा यांना प्रवेश मिळाला. पण त्यांना दोन अडचणींचा सामना करावा लागला. एक म्हणजे त्यांचं वय आणि दुसरा इंग्रजी भाषेचा. त्यानंतर त्यांनी खर्चावर मर्यादा आणत इंग्रजी पुस्तकं घेतली अन् इंग्रजी शिकायला सुरुवात केली. ते कोडींगही शिकले. पण आर्थिक स्थितीमुळं अमेरिकेच्या विद्यापाठीतून शिक्षण घेणं शक्य नव्हतं. कॉलेज सुरू असताना त्यांनी मित्रांसोबत एक स्टार्टअप सुरू केला.

17 व्या लोकसभेने विक्रम केले, देश आपल्याला लक्षात ठेवेल, अखेरच्या संबोधनात PM मोदी भावूक

वन 97 कम्युनिकेशन्सची स्थापना
टेक्नॉलॉजी रिपोर्टर आणि लेखक विजय मेनन यांनी त्यांच्या ‘इनोव्हेशन स्टोरीज इन इंडिया इंक’ या पुस्तकात पेटीएमबाबत लिहिलं आहे. कॉलेजमध्ये असताना विजय शेखर यांनी भारताच्या पर्यटन क्षेत्रावर एक वेबसाईट तयार केली. नंतर ही बेवसाईट दिल्लीच्या एका मीडिया हाऊसला विकली. यातून त्यांना रोख रक्कम आणि कंपनीत आयटी प्रमुख पद मिळालं. दोन वर्ष आयटी कंपनीत काम केल्यानंतर ते पुन्हा व्यवसायात उतरले आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वन 97 ची स्थापना केली. एसएमएसच्या काळात त्यांची कंपनी टेलिकॉम ग्राहकांना जोक्स, बातम्या, क्रिकेट अपडेट, ज्योतिष अशा व्हॅल्यू अॅडेड सेवा पुरवत होती.

2009 मध्ये ‘पेटीएम’ लाँच
2007 मध्ये 2 जी सेवा सुरु झाली होती. ग्राहक मिळवण्यासाठी कंपन्यामध्ये प्रचंड स्पर्धा होती. ग्राहकांना रिचार्जची मोठी समस्या होती. हीच संधी शोधत त्यांनी 2009 मध्ये ‘पेटीएम’ लाँच केलं. त्याद्वारे मोबाईल बॅलेन्स टॉपअप, रिचार्ज शक्य झालं. त्यानंतर 2012 मध्ये पेमेंट गेटवे आणि 2013 मध्ये वॅलेट सेवेला आरबीआयने मंजुरी दिली.

Anushka Sen :बॉडीकॉन आउटफिटमध्ये अनुष्का सेनने शेअर केला हॉट लूक

2014 नंतर देशात 4-जीने क्रांती केली. रिलायन्सनं Jio लाँच केल्यामुळं टेलीकॉम सेक्टर प्रचंग वेगानं वाढलं. लोकांच्या हातात स्मार्टफोन आले. त्याचबरोबर मोबाइल वॉलेटचा वापरही वाढला. 2017 मध्ये पेमेंट्स बँक आणि फास्टॅगला मंजुरी मिळाली तर 2019 मध्ये स्टॉक ब्रोकर आणि 2020 मध्ये लाइफ अँड जनरल इंश्यूरन्स ब्रोकरला मंजुरी मिळाली. यातून पेटीएमला भविष्यातील संधी निर्माण झाल्या.

नोटबंदी पेटीएमच्या फायद्याची ठरली
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदीची घोषणा केली. एका रात्रीत देशाच्या बाजारपेठेतून 85 टक्केहून अधिक मूल्याच्या नोटा रद्द करण्यात आल्या. यात काळात लोकांनी क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, ऑनलाइन शॉपिंग असे पर्याय समोर आले.

पण लहान व्यवहारांसाठी सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय पर्याय ई वॉलेटचाच होता. यातून ऑनलाईन पेमेंट आणि पेटीएमचं कनेक्शन घट्ट झालं. नोटबंदीच्या घोषणेनंतर तीन महिन्यांत पेटीएम यूझर्सच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली. त्यानंतर सुमारे 19 कोटी खाते पेटीएमवर तयार झाले.

Government Schemes : मुद्रा योजना नेमकी आहे तरी काय? कसा मिळणार फायदा?

2015 मध्ये कंपनीचं उत्पन्न 336 कोटी होतं. पण 2017 मध्ये ते वाढून 828.6 कोटी झालं. 30 कोटी यूझर्स रोज सरासरी 70 लाख ट्रान्झॅक्शन करत. ती रक्कम 9.4 अब्ज डॉलरवर होती. डिसेंबर 2016 मध्ये चीनचे प्रसिद्ध अब्जाधीश जॅक मा यांच्या कंपनीनं पेटीएममध्ये गुंतवणूक केली. त्यामुळं कपनीचं मूल्यांकन 4.86 अब्ज डॉलरवर गेलं. त्यामुळे विजय शेखर शर्मा हे वयाच्या 38 वर्ष देशातील सर्वात कमी वयाचे अब्जाधिश बनले.

आयपीओतून मोठा फटका
शॉपिंगपासून ऑनलाईन तिकिट सेवा, गॅस, वीज, क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बिल भरण्याची सुविधा; रिचार्ज आणि फास्टटॅग अशा सेवा देऊन ‘वन-स्टॉप सॉल्यूशन’ बनण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय म्युच्युअल फंड, डिजिटल गोल्ड, जनरल आणि लाइफ इंश्यूरन्स आणि पर्सनल, मर्चंट, होम आणि कार लोन या सेवा देखील दिल्या.

IND vs ENG: उर्वरित तीन कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा, आकाश दीपला लॉटरी

एकेकाळी कंपनीच्या ई कॉमर्स साइटशिवाय 40 कोटी यूझर्स रोज अडीच कोटी आर्थिक व्यवहार करत होते. कंपनीतील सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना त्यांचे काही शेअर्स विक्री करायचे होते. त्यामुळं आयपीओची मदत घेण्यात आली. पण नफा हाती नसल्यामुळं तज्ज्ञांनी याला चांगलं रेटिंग दिलं नाही. लोकांनी कमाईची संधी जायला नको म्हणून यासाठी नोंदणी केली आणि कंपनीनं बाजारातून 18 हजार 300 कोटी रुपये मिळवले.

2150 रुपयांच्या शेअरमध्ये पहिल्याच दिवशी 9 ते 27 टक्के घसरण झाल्याने कंपनीला 39 हजार कोटींचा फटका बसला. अमेरिकेतील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांची कंपनीने पेटीएममध्ये गुंतवणूक केली. आयपीओदरम्यान चीन आणि जपानच्या गुंतवणूकदारांनीही भागिदारी विकली.

आरबीआयच्या आदेशानंतर शेअर बाजारातून पेटीएमची घसरण सुरू राहिली. ती आता कशी थांबेल हे सांगत येत नाही. पण नागरिकांना लहान-सहान आर्थिक व्यवहारासाठी मोबाईलचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्यात पेटीएमच योगदान कोणीही नाकारू शकणार नाही.

मोदींचे राजकारण… शहांचे गणित अन् पाच भारतरत्न… राजकीय अर्थ काय?

follow us