Download App

पेटीएमला मोठा झटका! वॉलेट खाते इतर बँकांमध्ये शिफ्ट करण्याची शेवटची संधी

Paytm Crisis : सेंट्रल रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेविरोधात (Paytm Banking Service) आणखी कठोर पावले उचलली आहेत. तुम्ही पेटीएम यूजर असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. paytm द्वारे UPI पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी डिजिटल ट्रांजेक्शन योग्य रीतीने चालू राहावेत यासाठी RBI ने आज काही पावले उचलली आहेत. सेंट्रल बँकेने NPCI या डिजिटल पेमेंटवर देखरेख करणाऱ्या संस्थेला paytm खाते इतर नवीन बँकांमध्ये शिफ्ट करण्यास सांगितले आहे. यासाठी 15 मार्चपर्यंत संधी असणार आहे.

RBI ने NPCI ला UPI सिस्टीममध्ये वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या थर्ड पार्टी ऍप्लिकेशन प्रोव्हायडर होण्याच्या विनंतीचे पुनरावलोकन करण्यास सांगितले आहे. RBI सांगितले की OCL ला TPAP दर्जा मिळाला तर paytm कोणत्याही अडचणीशिवाय ग्राहकांना शिफ्ट करु शकतो.

राहुल गांधींना झारखंड हायकोर्टाचा मोठा धक्का, रांचीत खटला चालवला जाणार

RBI चा NPCI ला सल्ला
RBI ने NPCI ला paytm खाते इतर नवीन बँकांमध्ये शिफ्ट करण्याचा सल्ला दिला आहे. शिफ्टिंग पूर्ण होईपर्यंत OCL कोणतेही नवीन ग्राहक जोडू शकणार नाही. NPCI शिफ्टिंगसाठी 4-5 बँकांना पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून प्रमाणित करेल. या बँका उच्च दर्जाचे UPI व्यवहार करु शकतात.

पदार्पणात आकाश दीपची घातक गोलंदाजी, गडगडलेला डाव जो रूटने सावरला

पेटीएम युझर्संना आरबीआयचा सल्ला
पेटीएम मर्चंट्सना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून, पेटीएम पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर बँकेत सेटलमेंट खाते उघडून व्यवहार सुरळीत करू शकतो. आरबीआयने सल्ला दिला आहे की ज्या ग्राहकांकडे पेटीएमचे वॉलेट आहे त्यांनी त्यांचे वॉलेट इतर बँकांमध्ये उघडावे. RBI ने पेटीएम पेमेंट बँकेला जारी केलेल्या फास्टॅग आणि एनसीएमसी कार्डधारकांना 15 मार्चपूर्वी दुसरा पर्याय शोधण्याचा सल्ला दिला आहे.

Manoj jarange आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी घेणार का? स्पष्टीकरण मागत हायकोर्टाचा सवाल

follow us