Video : फेस्टिव सिजनमध्ये शॉपिंग करणाऱ्यांची बल्ले-बल्ले; RBI ने घेतले तीन मोठे निर्णय
UPI Limit Increased By RBI : आगामी काळात दसर आणि त्यानंतर दिवाळीचा उत्सव सुरू होणार आहे. या दोन्ही सणांसाठी नव-नवीन वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. हीच संधी साधत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने UPI वरून पेमेंट करणाऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय जाहीर केले आहेत. आरहीआयच्या या निर्णयामुळे फेस्टिव्ह सिजनमध्ये शॉपिंग करणाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. (RBI Shaktikant Das On UPI Payment)
खूशखबर! लवकरच सुरू होणार UPI lite ऑटो टॉपअप; जाणून घ्या, युजर्ससाठी काय खास..
काय सांगितलं शक्तिकांता दास यांनी?
आरबीआयचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत यंदाही रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गव्हर्नर शक्तिकांतादास यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, RBI ने UPI ची व्यवहार मर्यादा वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. याचा सर्वाधिक फायदा छोटे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. याशिवाय UPI Lite आणि UPI 123Pay बाबतही चांगला निर्णय घेण्यात आल्याचे दास म्हणाले.
सणासुदीच्या दिवसात फॅशन डिझायनर कुणाल रावल यांचं खास फेस्टिवल लूक
जाणून घ्या UPI बाबत RBI चे 3 मोठे निर्णय
1. UPI 123pay ची मर्यादा 5000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आली आहे.
2. UPI Lite ची वॉलेट मर्यादा देखील 2000 वरून 5000 रुपये करण्यात आली आहे आणि याद्वारे सामान्य लोकांना मोठा फायदा होणार आहे कारण ते लहान व्यवहारांसाठी UPI Lite मोठ्या प्रमाणावर वापरतात.
3. UPI Lite ची प्रति व्यवहार मर्यादा देखील वाढवण्यात आली असून, ही मर्यादा प्रति व्यवहार 500 वरून 1000 रुपये करण्यात आली आहे.
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, UPI व्यवहारांद्वारे भारताच्या आर्थिक परिदृश्यात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे देशात पैशांचे व्यवहार अतिशय सुलभ आणि सुलभ झाले असल्याचे यावेळी दास यांनी सांगितले.
Post Monetary Policy Press Conference by Shri Shaktikanta Das, RBI Governor- October 09, 2024 at 12 noon https://t.co/EQuGkM7WOR
— ReserveBankOfIndia (@RBI) October 9, 2024
देशातील महागाई कमी (Inflation) होताना दिसत आहे. आजच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी आरबीआयने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेटमध्ये बदल केले होते. मे 2020 पासून फेब्रुवारीपर्यंत व्याजदरात बदल होत राहिले. त्यानंतर मात्र व्याजदर कायम ठेवण्याचा ट्रेंड सुरू झाला. बँकेच्या या निर्णयाचा फटका कर्जदारांना बसणार आहे. होम लोन, कार लोनसह अन्य कर्जांच्या हप्त्यात कपात होण्याची शक्यता आता राहिलेली नाही. ईएमआय कमी होण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.