खूशखबर! लवकरच सुरू होणार UPI lite ऑटो टॉपअप; जाणून घ्या, युजर्ससाठी काय खास..

खूशखबर! लवकरच सुरू होणार UPI lite ऑटो टॉपअप; जाणून घ्या, युजर्ससाठी काय खास..

UPI Lite Auto top-up Feature : आताच्या डिजिटल पद्धतीत रोजच नवनवीन फिचर्स येत आहेत. यामुळे ऑनलाइन व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित झाले आहेत. आताही युपीआय लाइट युजर्ससाठी आनंदाची बातमी आली आहे. जर तुम्ही देखील पैसे देवाणघेवाणीसाठी UPI Lite फिचरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाचीच आहे. 31 ऑक्टोबरपासून तुम्ही तुमच्या UPI Lite अकाउंटमध्ये तुमच्या मनाला वाटेल तितकी रक्कम रिलोड करण्यासाठी ऑटो टॉपअप पर्यायाचा वापर करू शकाल.

एपीसीआयने यासंदर्भात नुकतेच एक परिपत्रक जारी करत घोषणा केली आहे. UPI Lite टॉपअप सुविधा याच वर्षात 31 ऑक्टोबरपासून लागू केली जाणार असल्याची माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे. UPI Lite बॅलन्स स्वयंचलित पद्धतीने संबंधित युजरने निश्चित केलेल्या रकमेमे रिलोड होईल. या मागचा मोठा उद्देश पाचशे रुपयांपेक्षा कमी रकमेचे व्यवहार पिनरहीत देवाणघेवाणीची सुविधा सोपी करणे हा आहे. युजरच्या युपीआय वॉलेटमध्ये दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम लोड करणे आणि युपीआय पिनचा वापर न करताच पाचशे रुपयांपर्यंतचे व्यवहार करण्याची सुविधा प्रदान करणे हा एक महत्वाचा उद्देश यामागे आहे.

UPI मध्ये बदल, बँक खात्याशिवाय होणार पेमेंट, ‘या’ लोकांना मिळणार फायदा

‘या’ गोष्टी पक्क्या लक्षात ठेवाच

पण यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. ती युजरने लक्षात ठेवली पाहिजे. UPI Lite बॅलन्स सुविधा दोन हजार रुपयांपर्यंत आहे. यापेक्षा जास्त रक्कम रिलोड करण्याची सुविधा सध्या नाही. त्यामुळे युजर्सना दोन हजारांपेक्षा जास्तीची रक्कम रिलोड करता येणार नाही. इतकेच नाही तर तुम्हाला एखादे वेळी वाटले की ही सुविधा आपल्याला नको आहे अशा वेळी ऑटो टॉप अप सुविधा रद्द करता येईल अशी माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे.

UPI Lite फिचर नेमकं काय?

UPI Lite हे एक खास फिचर आहे. युजर या फिचरच्या मदतीने पैसे देवाणघेवाणीचे व्यवहार करताना पिन नंबरची गरज राहणार नाही. ही सुविधा फक्त पाचशे रुपयांपर्यंतच्याच व्यवहारासाठी आहे. अशा प्रकारचे व्यवहार संबंधित बँकेच्या कोअर बँकिंग सिस्टीमचा उपयोग न करताच होतात.

UPI lite वर युजरने अॅप सुरू केल्यानंतर पिन नंबर न टाकताच पैसे देवाणघेवाणीचा व्यवहार करता येईल. यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात घेतल्या तर फायदाच होईल.

HDFC बँकेचा मोठा निर्णय; ‘फुटकळ’ UPI ट्रॅझॅक्शनसाठी पाठवला जाणार नाही SMS अलर्ट

जारीकर्ता बँक UPI lite वर ऑटो टॉपअपला पाठिंबा देतील. यामध्ये बँका UPI lite आदेशित करणे आणि विनंती आल्यानंतर डेबिटची परवानगी देतील.

NPCI ने असेही निर्देश दिले आहेत की यूपीआय अॅपवर आवश्यक कार्यक्षमता आणि इंटरफेस देतील ज्यामुळे ग्राहकांना UPI lite ऑटो टॉपअप फिचर वापरण्यात अडचणी जाणवणार नाहीत.

प्रत्येक UPI lite अकाइउंटसाठी ऑटो रिप्लेनिशमेंट व्यवहारांची संख्या एका दिवसांत पाच पर्यंत मर्यादित असेल.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube