HDFC बँकेचा मोठा निर्णय; ‘फुटकळ’ UPI ट्रॅझॅक्शनसाठी पाठवला जाणार नाही SMS अलर्ट
HDFC Bank Will Not Send SMS Alerts For Small UPI Transactions : खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक HDFC ने आपल्या ग्राहकांसाठी एक प्रमुख सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 25 जूनपासून ही सुविधा बंद केली जाणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. या निर्णयानुसार 100 रूपयांपेक्षा कमी आणि 500 रुपयांपेक्षा कमी ठेवींवर 25 जूनपासून SMS अलर्ट ग्राहकांना पाठवला जाणार नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. मात्र, या संबंधितचे नोटिफिकेशन ग्राहकांना ईमेलद्वारे मिळत राहणार असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.
80 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या ‘या’ शानदार बाइक्सना खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
नेमके निर्णय काय?
UPI ट्रॅझॅक्शन अलर्टबाबत निर्णय जाहीर करताना बँकेने म्हटले आहे की, UPI द्वारे 100 रुपयांपेक्षा कमी आणि खात्यात 500 रुपयांपेक्षा कमी पैसे जमा झाल्यास याचा अलर्ट एसएमएस ग्राहकांना पाठवले जाणार नाहीत. हे अलर्ट पाहिजे असल्यास ग्राहकांनी त्यांचे ईमेल आयडी अपडेट करण्याचे आवाहन बँकेने केले आहे. छोट्या व्यवहारांवर मिळालेल्या फीडबॅकनुसार बँकेने हा निर्णय घेण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे.
जबरदस्त मायलेज अन् भन्नाट फीचर्स, 10 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करा ‘ह्या’ कार्स
छोट्या व्यवहारांसाठी UPI चा अधिक वापर
गेल्या काही वर्षांपासून यूपीआयचा सरासरी तिकीट आकार सातत्याने कमी होत आहे. यात 2022 ते 2023 या वर्षात 8 टक्क्यांनी घट झाली आहे. याचाच अर्थ छोट्या व्यवहारांसाठी यूपीआयचा अधिक वापर होत असल्याचे अधोरेखित होत आहे. वर्ल्डलाइन इंडियाच्या अहवालानुसार, PhonePe, Google Pay आणि Paytm हे देशातील तीन आघाडीचे UPI ॲप्स असून, NPCI डेटानुसार 2023 मध्ये UPI द्वारे व्यवहारांनी 100 अब्जांचा टप्पा गाठला होता.
Video : लहान मुलांसाठी सोशल मीडिया किती धोकादायक?; मस्कने उदाहरण देत सांगितले सत्य
दोन डिजिटल क्रेडिट कार्ड लाँच
HDFC बँकेने Pixel Play आणि Pixel Go ही दोन डिजिटल क्रेडिट कार्ड लॉन्च केली आहेत. ही डिजिटल क्रेडिट कार्डे बँकेच्या PayZapp ॲपद्वारे वापरली जाऊ शकतात. हे कार्ड 25,000 रुपयांपेक्षा जास्त पगार असलेल्या आणि 6 लाख रुपयांपर्यंत रिटर्न भरणाऱ्या लोकांना मिळू शकणार आहेत.