UPI द्वारे सोने आणि मालमत्ता कर्जासाठी… केंद्र सरकारचा गेमचेंजर निर्णय, नवीन नियम कोणते?

UPI द्वारे सोने आणि मालमत्ता कर्जासाठी… केंद्र सरकारचा गेमचेंजर निर्णय, नवीन नियम कोणते?

UPI Payment New Update : केंद्र सरकारतर्फे यूपीआय (UPI) वापरकर्त्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) यूपीआय द्वारे पेमेंट करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता वापरकर्ते यूपीआय द्वारे सोने कर्ज, व्यवसाय कर्ज आणि एफडी (FD) रक्कम देखील पाठवू शकतात. कर्ज खाते यूपीआय खात्याशी देखील जोडले जाऊ (Gold And Property Loans) शकते. या ॲपद्वारे, तुम्ही पेटीएम, फोनपे, गुगल पे सारख्या यूपीआय पेमेंट सुविधा प्रदान करणाऱ्यांद्वारे क्रेडिट कार्डपासून व्यवसाय कर्जांपर्यंत अनेकविध पेमेंट करू शकाल. 31 ऑगस्ट 2025 पूर्वी हे नियम लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अनेक महत्त्वाचे निर्णय

अलिकडेच एनपीसीआयने (NPCI) यूपीआय पेमेंट सिस्टीम सोपी, लवचिक आणि सुरक्षित करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता पुन्हा एकदा पेमेंटची व्याप्ती वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. सध्या यूपीआय वापरकर्ते फक्त बचत खाते किंवा ओव्हरड्राफ्ट खाते लिंक करू शकतात आणि त्यांच्याद्वारेच पेमेंट करू शकता. काही रूपे (RuPay) क्रेडिट कार्ड देखील यूपीआयशी जोडलेले आहेत परंतु त्यांची संख्या कमी आहे. आता नवीन नियमांमुळे ग्राहक बँकेत न जाता गोल्ड लोन आणि पर्सनल लोनसाठी ऑनलाइन पैसे काढू शकतील.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट ; न्यायालयात पुरावे टिकले नाहीत, चूक नेमकी कुणाची? उज्ज्वल निकम यांचा गंभीर सवाल

सुविधा कशी मिळवायची?

यूपीआयचे सध्याचे नियम पी टू एम (P2M) मनी ट्रान्सफरला परवानगी देतात. परंतु नवीन नियम लागू झाल्यानंतर, ग्राहक पी टू पी (P2P) सोबत पी टू पीएम (P2PM) व्यवहार करू शकतील. इतकेच नाही तर रोख रक्कम देखील काढू शकतील. परंतू एनपीसीआयने (NPCI) यासाठी काही नियम आणि कायदे केले आहेत. उदाहरणार्थ वापरकर्ते एका दिवसात फक्त 1 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट करू शकतील. तसेच एका दिवसात फक्त 10 हजार रुपये रोख काढू शकतील. याशिवाय, पी टू पी (P2P) दैनिक व्यवहारांची मर्यादा देखील 20 पर्यंत कमी करण्यात आली आहे.

मोक्काचे आरोपी भाजपला चालतात? रविंद्र चव्हाण म्हणाले, राष्ट्रीयत्व जागं असलेले सर्वजण…

कोणत्या प्रकारचे पेमेंट?

यासोबतच बँक हे देखील ठरवेल की, तुम्ही यूपीआयद्वारे कोणत्या प्रकारचे पेमेंट करू शकता. समजा तुम्ही वैयक्तिक कर्ज घेतले असेल, तर बँक तुम्हाला कर्जाची रक्कम फक्त रुग्णालयाचे बिल किंवा शिक्षण शुल्क यांसारख्या आवश्यक गोष्टींसाठी वापरण्याची परवानगी देऊ शकते. ही सुविधा विशेषतः अशा लहान व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल जे 2-3 लाख रुपयांचे व्यवसाय कर्ज घेतात आणि कुठेही पैसे भरण्यासाठी वारंवार बँकेत जावे लागते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube