काय सांगता! क्रेडिट कार्डमुळेही होते पैशांची बचत; ‘या’ टीप्स करतील मोठी मदत

काय सांगता! क्रेडिट कार्डमुळेही होते पैशांची बचत; ‘या’ टीप्स करतील मोठी मदत

Credit Card : क्रेडिट कार्ड युजर्सची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. काही युजर्सना असे वाटते की क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर जास्त केल्याने खर्च वाढतो पण असे काहीच नाही. युजर्स काही सोप्या पद्धतीने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैशांची बचत करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या पद्धतींची माहिती देणार आहोत.

योग्य कार्डची निवड करा

जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जास्त पैशांची बचत करू इच्छित असाल तर यासाठी तुम्ही योग्य कार्डची निवड करणे आवश्यक आहे. कार्ड निवड करण्याआधी तुम्ही तुमच्या खर्चाचे विश्लेषण करा नंतर या नुसारच क्रेडिट कार्ड निवड करा.

वेलकम बोनस

बँक आपल्या नवीन ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी वेलकम बोनस देत (Welcome Bonus) असतात. या बोनसमध्ये रिवॉर्ड, डिस्काउंट आणि कूपन यांचा समावेश असतो. या बोनसमध्ये युजरने ठराविक रक्कम खर्च केल्यानंतर कॅश बॅक, अतिरिक्त रिवार्ड पॉइंट, व्हाउचर किंवा गिफ्ट कार्ड सुविधा दिली जाते.

होम लोनचा हप्ता कमी करायचाय? मग, ‘या’ 5 टिप्स नक्कीच करतील मदत

क्रेडिट कार्ड बिल

क्रेडिट कार्ड युजर्स अनेकदा बिल वेळेवर भरत नाहीत. यामुळे त्यांचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) खराब होतो. तसेच उशिरा बिल भरले म्हणून युजरला जास्त व्याज सुद्धा द्यावे लागते. या गोष्टी टाळायच्या असतील तर नेहमी वेळे आधीच बिल भरून टाकण्याची सवय लावून घ्या.

रीवॉर्ड पॉइंट

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शॉपिंग करण्यावर रीवार्ड पॉइंट मिळतात. या पॉईंटचा उपयोग शॉपिंग एअरपोर्टवर लाउंज एक्सेससाठी केला जाऊ शकतो. काही बँका या रिवार्ड पॉईंट्सना कॅश मध्ये रुपांतरीत करण्याचीही सवलत देतात.

क्रेडिट कार्ड ऑफर

क्रेडिट कार्ड देणारी कंपनी किंवा बँक आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या ऑफर देत असतात. या ऑफर्सचा वापर करून सुद्धा तुम्ही पैशांची मोठी बचत करू शकता. या काही सोप्या उपायांच्या माध्यमातून तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे देखील पैशांची बचत करू शकता. तरी देखील क्रेडिट कार्ड मिळाले म्हणून शक्यतो अवावश्यक खर्च टाळलेलेच तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

Explainer : विमान अपघाताच्या घटना का वाढल्यात? कारणं अन् उपाय दोन्ही बाजू समजून घ्याच!

क्रेडिट कार्ड म्हणजे काय

क्रेडिट कार्डचा सोप्या भाषेत अर्थ म्हणजे आधी खर्च करा नंतर पैसे द्या. तसं पाहिलं तर ही पद्धत खूप जुनी आहे. पण क्रेडिट कार्डची सुरुवात विसाव्या शतकाच्या मध्यातील मानली जाते. परंतु याचा पाया 1900 मधील सुरुवातीच्या काही वर्षांतच पडला होता. अमेरिकेसारख्या देशांत डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि तेल कंपन्यांनी आपले क्रेडिट कार्ड लॉन्च केले होते. पण हे कार्ड आजच्या ट्रॅडिशनल कार्ड सारखे नव्हते. या कार्डचा उपयोग काही ठराविक स्टोअर्स वरच केला जाऊ शकत होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube