Box Office: पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘क्रॅक’चा धिंगाणा! कमावले ‘इतके’ कोटी

Box Office: पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘क्रॅक’चा धिंगाणा! कमावले ‘इतके’ कोटी

Crakk Box Office Collection Day 1: 23 फेब्रुवारीला ‘क्रॅक’ (Crakk Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ‘सिनेमा प्रेमी दिना’च्या दिवशी 99 रुपयांना पाहता येणार आहे, यामुळे चित्रपटाच्या कमाईवर काही प्रमाणात परिणाम होईल पण तरीही चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळेल असे म्हटले जात आहे. आदित्य दत्त (Aditya Dutt) दिग्दर्शित क्रॅक (Crakk Movie) हा एक ॲक्शन पॅक्ड चित्रपट आहे. यामध्ये विद्युत जामवालची (Vidyut Jamwal) अप्रतिम बॉडी दिसणार आहे. यासोबतच अर्जुन रामपालही (Arjun Rampal) जबरदस्त ॲक्शन अवतारात दिसणार आहे.

विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपाल अभिनीत या ॲक्शन-पॅक्ड चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंग चांगली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाची पहिल्या दिवसाची तिकिटे जवळपास 50 हजार रुपयांना विकली गेली. आता यानुसार चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘क्रॅक’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली? विद्युत जामवालच्या चित्रपटांमध्ये ॲक्शन नाही हे शक्य नाही. त्याच्या चित्रपटांमध्ये काही रोमँटिक कथांनाही ॲक्शनची जोड दिली जाते. क्रॅक या चित्रपटाबाबतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्युत जामवाल आणि नोरा फतेही यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे, त्यामुळे त्यांचे चाहते हा चित्रपट पाहायला नक्कीच जाणार आहेत. Sacnilk च्या मते, क्रॅक चित्रपट पहिल्या दिवशी सुमारे 3 कोटी रुपये कमवू शकतो. रिपोर्ट्सनुसार, क्रॅक चित्रपटाचे बजेट जवळपास 60 कोटी रुपये आहे आणि चित्रपटाला हिट होण्यासाठी किमान 80 ते 90 कोटी रुपये कमवावे लागणार आहेत.

काकस्पर्श ते ही अनोखी गाठ मांजरेकरांनी सांगितली चित्रपटांमागची खास स्ट्रॅटेजी

आदित्य दत्त दिग्दर्शित क्रॅक या चित्रपटाची निर्मिती ॲक्शन हिरो फिल्म्स प्रोडक्शन कंपनीने केली आहे. ही कंपनी विद्युत जामवालची आहे आणि त्याने या चित्रपटात पैसे गुंतवले आहेत आणि मुख्य अभिनेता म्हणून काम केले आहे. शिवाय नोरा फतेही आणि अर्जुन रामपाल हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता हा चित्रपट भविष्यात किती कमाई करतो हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

विद्युत जामवाल हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने कमांडो सीरिजचे तीन चित्रपट, IBT71, खुदा हाफिज केले आहेत. वयाच्या 43व्या वर्षीही विद्युतची बॉडी एकदम फिट आहे आणि चाहत्यांना त्याची स्टाइल देखील कायम आवडते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube