IND Vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी 17 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली टीम इंडियाचा भाग नसेल. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार विराट कोहली (Virat Kohli) वैयक्तिक कारणांमुळे खेळू शकणार नाही. याशिवाय भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या मालिकेतील आगामी सामन्यांचा भाग असणार नाही. या 17 सदस्यीय भारतीय संघात बंगालचा गोलंदाज आकाश दीपला (Akash Deep) संधी मिळाली आहे.
केएल राहुल आणि रवींद्र जडेजा खेळणार का?
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचा वैद्यकीय टीमकडून फिटनेस मंजुरी मिळाल्यानंतर समावेश केला जाईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. तर चौथी कसोटी 23 फेब्रुवारीपासून रांचीमध्ये खेळवली जाणार आहे.
या मालिकेतील पाचवी कसोटी 7 मार्चपासून धरमशाला येथे खेळवली जाणार आहे. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव केला, पण विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले.
Virat Kohli : ज्याची भीती होती तेच झालं! विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून आऊट
शेवटच्या 3 कसोटीसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप
मोदींचे राजकारण… शहांचे गणित अन् पाच भारतरत्न… राजकीय अर्थ काय?
कोण आहे आकाश दीप…
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व्यतिरिक्त आकाश दीपने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उर्वरित रेस्ट ऑफ इंडिया आणि बंगालचे प्रतिनिधित्व केले आहे. 29 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये आकाश दीपने 3.04 च्या इकॉनॉमी आणि 23.18 च्या सरासरीने 103 फलंदाजांना बाद केले आहे. या युवा गोलंदाजाने 4 वेळा एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. तर एका सामन्यात 10 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. याशिवाय आकाश दीपने 28 लिस्ट-ए सामने खेळले आहेत.
Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंतचा नवा लूक पाहून चाहते घायाळ