मोदींचे राजकारण… शहांचे गणित अन् पाच भारतरत्न… राजकीय अर्थ काय?
Bharat Ratna : कर्पूरी ठाकूर… चौधरी चरण सिंग… नरसिंह राव, एमएस स्वामीनाथन आणि लालकृष्ण अडवाणी…. मोदी सरकारच्या एका निर्णयाने हे सर्व भारताचे अभूतपूर्व रत्न बनले आहेत. त्यांना मिळालेला भारतरत्न (Bharat Ratna) हा केवळ चांगल्या कामासाठी बक्षीस, पुरस्कार किंवा प्रोत्साहन नसून त्यामागे एक मोठं राजकारण दडलेले आहे… मोदींचे राजकारण… शहांचे गणित आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) जिंकण्याची ब्ल्यू प्रिंट. पुरस्काराचे टायमिंग पाहिले तर नितीश कुमार यांच्या एनडीए प्रवेशापूर्वी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यात आला, आता जयंत चौधरी यांना आपल्या गोटात आणण्यासाठी चौधरी चरणसिंग यांना सर्वोच्च सन्मान दिला जात आहे.
सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास या केवळ घोषणा आहे, परंतु त्याचे राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मोदींचा संपूर्ण प्लॅन तुमच्याही लक्षात येईल. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना पुरस्कार देऊन शेतकरी आणि जाटांना खुश केले, माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचा सन्मान करून काँग्रेसला अपमानीत करण्याची आणखी एक संधी, माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना सर्वोच्च सन्मान देऊन मागासवर्गीयांना आपलेसे केले आणि कृषी शास्त्रज्ञ स्वामीनाथन यांना भारतरत्न देऊन दक्षिण भारत जोडला. यासोबतच अडवाणींच्या माध्यमातून राम लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. म्हणजे पंतप्रधान मोदींना पाच भारतरत्नांसह पाच मोठे राजकीय लाभ होणार आहेत. त्या राजकीय गणितांची 2024 च्या विजयश्रीची स्क्रिप्ट लिहिली.
या स्क्रिप्टमध्ये पाच कलाकार आहेत- शेतकरी, जाट, ओबीसी, हिंदू आणि काँग्रेस. आधी शेतकऱ्यांबद्दल बोलूया, मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात अनेकवेळा दावा केला आहे – आता स्वतंत्र भारतात शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक काम झाले आहे. आपल्या किसान निधी योजनेचा सर्वत्र प्रचार करत आहेत. पण शेतकरी जर खुश असतील तर मग दिल्लीत आंदोलन का करण्यात आले? शेतकरी एवढाच समाधानी असेल तर एमएसपीबाबत रस्त्यावर का उतरतोय? आता या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नसतील, पण त्या शेतकऱ्यांची मने जिंकण्यासाठी चौधरी चरणसिंग यांची मदत होणार आहे.
‘औरंगाबाद अन् उस्मानाबाद’ नावानेच लोकसभा निवडणूक : नामांतराची दखल घेण्यास आयोगाचा नकार
चौधरी चरणसिंग हे शेतकऱ्यांचे सर्वात मोठे नेते, जाटांचे मसिहा आणि पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. या प्रदेशातून आलेले ते देशाचे एकमेव पंतप्रधान होते, म्हणूनच चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन हा संपूर्ण शेतकरी पट्टा, संपूर्ण जाट पट्टा आपल्याकडे करण्याचा मानस आहे. आकड्यांतून समजून घेण्याचा प्रयत्न केला तर. पश्चिम उत्तर प्रदेशात 22 जागांवर जाटांचे वर्चस्व आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच CAA ची अंमलबजावणी होणार! अमित शहांची सर्वात मोठी घोषणा
नरसिंह राव हे आंध्र प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान बनणारे दक्षिण भारतातील पहिले व्यक्ती होते. भाजपला दक्षिणेत आपल्या जागा वाढवायच्या आहेत. दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील जागांवर भाजपची नजर आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाच्या (जेएसपी) जवळ जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
Manoj Jarange : तुला अक्कल होती तर जेलमध्ये कशाला गेला…जरागेंनी भुजबळांना डिवचले