पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरीची संधी, विविध पदांच्या 65 जागांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

  PCMC Vacancy 2024 : जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल आणि तुम्ही उत्तम पगाराच्या नोकरीच्या (Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये फिजिशियन (Physician), प्रसृती, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ज्ञ, (Pediatrician) नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार […]

पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरीची संधी, विविध पदांच्या 65 जागांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

PCMC Vacancy 2024

 

PCMC Vacancy 2024 : जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल आणि तुम्ही उत्तम पगाराच्या नोकरीच्या (Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये फिजिशियन (Physician), प्रसृती, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ज्ञ, (Pediatrician) नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, ईएनटी तज्ज्ञ अशा विविध पदांच्या एकूण 65 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

अमित ठाकरे नगर दक्षिण लोकसभा लढवणार? मनसेनं आवळला सूर 

नुकतीच पालिकेने या पदभरतीबाबत अधिसूचना प्रकाशित केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. उमदेवारांना आपले अर्ज हे नोटिफिकेशमध्ये दिलेल्या ईमेलवर पाठवायचे आहेत. त्यानंतर पदांनुसार पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. . इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. उमेदवारांच्या मुलाखती आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी सकाळी 11.00 ते 11.00 या वेळेत घेतल्या जातील.

दरोडा टाकून चोरट्याने केला हवेत गोळीबार पण त्याचाच घात; नेमकं काय घडलं? 

पदांचा तपशील-

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, ईएनटी तज्ज्ञ या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकूण ६५ रिक्त पदांसाठी भरती करणार आहे.
फिजिशियन – ०9
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ -09
बालरोग तज्ज्ञ – 09
नेत्ररोग तज्ज्ञ-09
त्वचारोग तज्ज्ञ-09
मानसोपचार तज्ज्ञ – 10
ENT विशेषज्ञ -10

शैक्षणिक पात्रता
फिजिशियन- MD मेडिसिन/DNB
प्रसूती आणि स्त्रीरोग – MD/MS स्त्रीरोगतज्ज्ञ/DGO/DNB
बालरोगतज्ञ – MD PEDS/ DCH/ DNB
नेत्ररोग तज्ज्ञ – एमएस नेत्ररोग तज्ज्ञ/DOMS
त्वचाशास्त्रज्ञ – MD (त्वचा/VD), DVD, DNB
मानसोपचार तज्ज्ञ – MD मानसोपचार/DPM/DNB
ईएनटी विशेषज्ञ – एमएस ईएनटी/डीओआरएल/डीएनबी

वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 70 वर्षे आहे.

निवड प्रक्रिया
पिंपरी चिंचवड महापालिकेतील अंतर्गत भरती पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

मुलाखतीचा पत्ता
पिंपरी चिंचवड महानगरपालिका इमारत, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- 411 018

मुलाखतीची तारीख आणि वेळ
पिंपरी चिंचवड महापालिकेतील अंतर्गत भरतीसाठी उमेदवारांच्या मुलाखती आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी सकाळी 11.00 ते रात्री 11.00 या वेळेत घेण्यात येत आहेत.

अधिकृत वेबसाइट – https://www.pcmcindia.gov.in/

अधिसुचना –
https://drive.google.com/file/d/1MiI1ztG2hCnoRhaqCd_ksdpcf5_bh8gj/view

उमदेवारांना अर्ज हा ईमेलने पाठवायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. नंतरच अर्ज करावा. कारण, अर्ज करतांना काही चुका झाल्यास अर्ज नाकारल्या जाईल, याची उमदेवांनी नोंद घ्यावी.

Exit mobile version