चोरट्याने केला गोळीबार पण त्याचाच घात; नेमकं काय घडलं?

चोरट्याने केला गोळीबार पण त्याचाच घात; नेमकं काय घडलं?

Pune News : दरोडा टाकून चोरट्यांने गोळीबार केला पण गोळीने स्वत:च चोरटा जखमी झाल्याची घटना घडली. पुण्यातील शिरुर शहरातील सराफ बाजारपेठेत ही घटना घडली. दरम्यान, सराफ व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांकडून हद्दपार करण्यात आलं असून त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहे. पुणे स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आलीयं.

PHOTO: अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्मला सीतारामन यांनी नेसली खास साडी; फोटो पाहाच!

नेमकं काय घडलं?
सराफ व्यावसायिक अशोक कोलये व त्यांचा कामगार नामे भिका एकनाथ पंडीत वय ५० वर्षे रा. शिरूर हे दि.२८ रोजी दुकान बंद करत असताना मोटार सायकलवर आलेल्या अनोळखी दोन इसमांनी बंदुकीचा वापर करून सराफ चुकानातील सोने लुटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भिका पंडीत यांनी विरोध केल्याने अनोळखी इसमांनी त्यांचेकडील पिस्टलमधून भिका पंडीत यांचे डोक्यात पिस्टलचा बट मारला व त्यांच्यावर पिस्टलमधून गोळी फायर केली. मात्र ही गोळी जमिनीवर आदळून चोरट्यालाच लागली असल्याने चोरटा जखमी झाला आहे. त्याबाबत भिका पंडीत वय ५० वर्षे, पुणे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्यावतीने तात्काळ सुरू करण्यात आला आहे. शहरातील मुख्य सराफ बाजारपेठेत गुन्हा घडल्याने व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तपास पथकाने गुन्हयाचे अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित आरोपीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे वर्णनाचा इसम असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. गोपनीय माहितीचे आधारे सदरचा गुन्हा हा गुन्हेगार नामे शरद बन्सी मल्लाव रा. शिरूर ता. शिरूर जि पुणे याने त्याचा साथीदार नामे सागर ऊर्फ बबलू दत्तात्रय सोनलकर रा, धायरी पुणे याचे मदतीने केला असल्याचे समजले.

राज्यातील 44 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलिस आयुक्त

सदरचे आरोपी हे सिंहगड किल्ल्याचे जंगलात लपून बसले असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर तपास पथकाने सिंहगड किल्ला परीसरातील जंगलातून गुन्हयातील मुख्य आरोपी नामे शरद बन्सरी मल्लाव वय २४ वर्षे, रा. काची आळी, शिरूर पुणे यास पकडण्यात आले. त्याच्याकडून तीन गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतूस व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकूण १,२५,२००/- किंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्याचा साथीदार सागर ऊर्फ बबलू दत्तात्रय सोनलकर वय २३ वर्षे रा. धायरी पुणे हा जखमी असून तो ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचार घेत असल्याने त्यास अटक करण्यात येणार आहे.

दरम्यान, सदरचे दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील असून आरोपी शरद मल्लाव याच्यावर शरीराविरुद्धचे व बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगण्याबाबतचे एकूण ७ गुन्हे दाखल असून सदर आरोपी हा पुणे ग्रामीण जिल्हा व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून एक वर्णनाकरीता हद्दपार करण्यात आलेले आहे. तसेच आरोपी सागर ऊर्फ बबलु सोनलकर याच्यावर ०२ गुन्हे दाखल आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube