Download App

पिंपरी-चिंचवड महापालिकेत 10 वी पास उमदेवारांना नोकरीची संधी, महिन्याला 63 हजार रुपये पगार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नुकतीच विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत फायरमन रेस्क्युअर पदे भरली जाणार.

PCMC Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) नुकतीच विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत फायरमन रेस्क्युअर/अग्निशमन विमोचन (Fireman Rescuer) ही गट-ड संवर्गातील एकूण 150 रिक्त पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, याच पदभरतीविषयी जाणून घेऊ.

हेमंत गोडसे भुजबळांवर कसे ठरले वरचढ; समजून घ्या नाशिकचं समीकरण… 

एकूण पदे – 150 रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता –
या पदभरती अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे खालील पात्रता असावी.
(1) 10वी उत्तीर्ण. (२) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासनाकडून ६ महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. (3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा –
दिनांक 17 मे 2024 रोजी उमेदवाराचे वय हे 28 ते 30 वर्षाच्या दरम्यान असावे. सरकारी नियमानुसार मागासवर्गीय  उमदेवारांना वयात सवलत दिली जाणार आहे.
(मागासवर्गीय/अनाथ – 33 वर्षे, खेळाडू – 43 वर्षे, माजी सैनिक आणि त्यांची मुले – 45 वर्षे).

शारीरिक पात्रता –
उंची – पुरुष – 165 सेमी, महिला – 162 सेमी;
वजन – पुरुष/स्त्री – 50 किलो;
छाती – पुरुष – 81-86 सेमी;
दृष्टी – सामान्य (रंग अंधत्व नसावे.)

शारीरिक क्षमता चाचणी –
पुरुष – (अ) 1,600 मी. धावणे – ३० गुण,
(ब) जमिनीपासून ३३ फूट उंच खिडकीवर बसवलेल्या ॲल्युमिनियमच्या विस्ताराच्या शिडीवर खिडकीपर्यंच चडून त्याच शिडीने खाली उतरणे – 20 गुण.
(क) 50 किग्रॅ. वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर धावणे – 20 गुण
(ड) 20 फूट उंचीपर्यंत चढणे आणि उतरणे – 20 गुण,
(ई) पुलअप 20 – 10 गुण
एकूण 100 गुण.

परीक्षा शुल्क –
खुला प्रवर्ग – रु. 1,000/-,
मागासवर्ग – रु. 900/-
माजी सैनिकांचे शुल्क माफ केले जाईल. शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाते.

वेतन श्रेणी – S-6 रु. 19,900 – 63,200/-

निवड प्रक्रिया – शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. ऑनलाइन परीक्षेचे ठिकाण, तारीख, वेळ आणि बैठक व्यवस्था याबाबतची माहिती तसेच ऑनलाइन परीक्षेनंतर उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी महापालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.

परीक्षेचे स्वरूप –
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर प्रत्येक 15 प्रश्न आणि अग्निशमन विषयावरील प्रत्येकी 100 प्रश्न MCQ स्वरूपाचे प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण, एकूण 100 गुण. वेळ 120 मिनिटे.
परीक्षेचे माध्यम मराठी आणि इंग्रजी असेल.

ऑनलाइन अर्ज – pcmchhelpdesk2024@gmail.com
वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

अर्ज करण्याची अंतिम तारीख – १७ मे २०२४ पर्यंत करायचे आहे.

उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करतांना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. दिलेल्या तारखेपर्यंतच अर्ज करावे. उशीरा आलेले अर्ज आणि अपुरी माहिती असलेले अर्ज नाकारल्या जातील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

follow us