हेमंत गोडसे भुजबळांवर कसे ठरले वरचढ; समजून घ्या नाशिकचं समीकरण…

हेमंत गोडसे भुजबळांवर कसे ठरले वरचढ; समजून घ्या नाशिकचं समीकरण…

Hemant Godse will contest Lok Sabha from Nashik : नाशिक लोकसभा (Nashik Lok Sabha) मतदारसंघात महायुतीत (Mahayuti) निर्माण झालेला तिढा आज अखेर सुटला आहे. या मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेनेचे विद्यमान खासदाहेमंत गोडसे (Hemant Godse)यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपात नाशिकची जागा कोणाला मिळणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आज गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

गणित मायनस नाही प्लस झालंय! रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सांगितला नवा फॉर्मूला 

नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) इच्छुक होते. तर शिवसेनेकडून हेमंत गोडसे इच्छुक होते. त्यांना उमेदवारी देणे जवळपास निश्चित झालं होतं. कारण, भुजबळ हे राज्यस्तरीय नेते असल्याने स्थानिक पातळीवर त्यांना विरोध होणे अशक्य होते. मात्र, गोडसे हे भुजबळांना भारी पडले असून त्यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली.

काका-पुतण्याचा केला दोनदा पराभव…
2009 मध्ये हेमंत गोडसे यांनी मनसेकडून पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी समीर भुजबळांचा 27000 मतांनी पराभव केला होता. यानंतर ते 2014 आणि 2019 मध्ये गोडसे सलग दोनदा निवडून आले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला होता, तर 2019 मध्ये त्यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांचा पराभव केला होता. त्यांनी समीर भुजबळांचा अडीच लाख मतांनी पराभव केला होता.

Pushpa 2: ‘पुष्पा 2’ चित्रपटामधील अल्लू अर्जुनचं नवीन पोस्टर रिलीज, जाणून घ्या… 

गोडसेंचा जनसंपर्क तगडा
गोडसेंचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. शांत, संयमी आणि अडीअडचणीला धावून येणारे लोकप्रतिनिधी म्हणून गोडसेंची ओळख आहे. एखादा नगरसेवक जसा जनतेच्या कामे करण्यासाठी तत्पर असतो, तसं गोडसेही मतदारांना सतत उपलब्ध असतात. गेल्या दहा वर्सात गोडसेंनी आपलं प्रचंड नेटवर्क उभं केलं. शिवसेनेचे नाशिक लोकसभा मतदारसंघात 1200 ते 1300 बुथ आहेत. तिथं गोडसेंची यंत्रणा सक्रीय आहे. नेमकं याच बाबतीत छगन भुजबळ कमी पडतात.

मराठा समाज गोडसेंसोबत
दुसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे, जातीय समीकरणे. नाशिक हा मराठा बहुल मतदारसंघ आहे. 20 लाखांमध्ये 8 ते 9 लाख मराठा मतदार आहे. म्हणजे, 45 टक्के मराठा समाज मतदारसंघात आहे. तर ओबीसी समाज 2 ते 3 लाख इतका आहे. जरांगेच्या आंदोलनानंतर भुजबळांनी मराठ्यांना विरोध केल्यानं नाशिकमध्ये भुजबळांना विरोध होते आहे. मराठ्यांचा भुजबळांना होत असलेला विरोध पाहता अजित पवार गटाच्या काही नेत्यांनीही भुजबळांना उमेदवारी देऊ नका, अशी भूमिका घेतली होती. एकूणच मराठा समाजामध्ये असलेली भुजबळांविषयी नाराजी, गोडसेंचा जनसंपर्क आणि निवडणुक येण्याची शक्यता पाहता भुजबळांचा पत्ता कट करून गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली.

दरम्यान, ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. वाझे हे एकनिष्ठ शिवसैनिक आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 2014 मध्ये ते शिवसेनेच्या तिकिटावर सिन्नरमधून निवडून आले होते. त्यांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळं नाशिक लोकसभा मतदारसंघात विजयाचा गुलाल कोण उधळतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज