people around the world are crazy about ChatGPT 250 crore questions are being asked every day : ओपन एआयचे (OpenAI) चॅटजीपीटी (ChatGPT) आता जगातील सर्वांत जास्त वापरल्या जाणाऱ्या एआय टूल्सपैकी एक बनले आहे. अॅक्सिओसच्या अहवालानुसार, आता दररोज 2.5 अब्जाहून अधिक प्रश्न (प्रॉम्प्ट) चॅटजीपीटीवर पाठवले जात आहेत. यापैकी 330 दशलक्ष (33 कोटी) प्रश्न एकट्या अमेरिकेतून येतात. चॅटजीपीटी लोकांमध्ये कसे लोकप्रिय होत आहे,जाणून घ्या.
चॅटजीपीटी इतके लोकप्रिय कसे?
अॅक्सिओसच्या अहवालानुसार, चॅटजीपीटी दररोज लाखो प्रश्नांची उत्तरे देत आहे. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी डिसेंबरमध्ये न्यू यॉर्क टाइम्स डीलबुक समिटमध्ये सांगितले की, चॅटजीपीटी दररोज 1 अब्ज प्रॉम्प्ट हाताळत आहे. त्यावेळीही ही संख्या धक्कादायक होती, पण आता ती दुप्पट झाली आहे.
2025 मध्ये बॉक्सऑफिसवर सैयाराची चलती; चार दिवसांत 100 कोटींपार
एका टेड (TED) चर्चेदरम्यान, सॅम ऑल्टमन यांनी उघड केले की, जगभरातील सुमारे 10 टक्के लोक चॅटजीपीटी वापरत आहेत. डिसेंबरमध्ये, चॅटजीपीटीचे 300 दशलक्ष साप्ताहिक वापरकर्ते होते. मार्चपर्यंत, ही संख्या 500 दशलक्ष साप्ताहिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचली. मे महिन्यात, असे समोर आले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत दैनिक सक्रिय वापरकर्त्यांची संख्या चौपट वाढली आहे.
UPI फ्री मग गुगल पे अन् फोन पे ने 5 हजार कोटी कसे कमावले? जाणून घ्या सिक्रेट!
मोफत आवृत्ती सर्वांत लोकप्रिय
जरी चॅटजीपीटी प्लसची सशुल्क आवृत्ती उपलब्ध असली तरी, बहुतेक लोक अजूनही मोफत आवृत्तीच वापरत आहेत. याचे कारण मोफत आवृत्तीचा वापरकर्ता-अनुकूल (यूजर-फ्रेंडली) इंटरफेस आणि अनेक वैशिष्ट्ये असू शकतात. बरेच लोक अभ्यासापासून ते ऑफिसच्या कामापर्यंत सर्व काही चॅटजीपीटीच्या मदतीने करत आहेत.
“सरकार भिकारी, शेतकरी नाही”, कृषिमंत्री कोकाटेंच्या वक्तव्याने खळबळ; फडणवीसांनी टोचले कान
चॅटजीपीटीची गुगल क्रोमशी स्पर्धा
ओपनएआय स्वतःला फक्त प्रश्न आणि उत्तरांपुरते मर्यादित ठेवू इच्छित नाही. अलीकडील अहवालानुसार, ओपनएआय आता एआय-चलित वेब ब्राउझर आणण्याची तयारी करत आहे, जो थेट गुगल क्रोमशी स्पर्धा करेल.
मोठी बातमी, 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आठवा वेतन; ‘या’ लोकांना होणार बंपर फायदा
याशिवाय, ओपनएआयने अलीकडेच चॅटजीपीटी एजंट नावाचे एक नवीन टूल लाँच केले आहे. ते वापरकर्त्याच्या संगणकावर स्वतःहून कामे पूर्ण करू शकते. हे टूल पूर्णपणे स्वायत्त आहे. याचा अर्थ वापरकर्त्याला प्रत्येक वेळी कमांड देण्याची आवश्यकता नाही.