Plastic VS Glass Lunch Box Which More Better : आपल्यापैकी बहुतेक जण सकाळी ऑफिसला जाताना घरातून जेवण (Food) सोबत घेऊन जातात. बरेच लोक कॅन्टीनऐवजी घरी बनवलेले अन्न पसंत करतात. परंतु तुम्ही सोबत नेलेले अन्न तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर (Health Tips) आहे का? हा प्रश्न उद्भवतो कारण जर तुम्ही प्लास्टिकच्या टिफिन बॉक्समध्ये अन्न घेऊन जात असाल तर ते धोकादायक ठरू शकते. त्यात गरम अन्न पॅक (Lunch Box) केल्याने अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच तज्ञ प्लास्टिकच्या कंटेनरऐवजी काचेचे कंटेनर वापरण्याची शिफारस करतात.
आरोग्यासाठी धोकादायक
प्लास्टिकच्या जेवणाच्या डब्यांमध्ये बीपीए आणि फॅथलेट्स सारखी रसायने असतात, ती गरम केल्यावर अन्नात मिसळू शकतात. ही रसायने कालांतराने आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. हे धोकादायक रसायने काचेच्या जेवणाच्या डब्यात आढळत नाहीत. त्यामुळे अन्न सुरक्षित राहते अन् आरोग्य देखील
राहते.
1 मे पासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
काचेच्या जेवणाच्या डब्या अन्नातील कोणताही वास किंवा डाग शोषून घेत नाहीत, त्यामुळे तुमच्या अन्नाची चव चांगली राहते. याशिवाय काच स्वच्छ करणे देखील सोपे आहे, तर प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये जेवणाचा वास टिकून राहू शकतो.
प्लास्टिक पर्यावरणासाठी हानिकारक
प्लास्टिक पर्यावरणासाठी हानिकारक आहे, कारण त्याचे विघटन होण्यास शेकडो वर्षे लागतात. काचेचे कंटेनर पुन्हा वापरता येण्याजोगे आणि पुनर्वापर करण्यायोग्य असतात. त्यामुळे प्लास्टिक कचरा कमी होतो आणि पर्यावरणाचे रक्षण होते. काचेचे कंटेनर मजबूत असतात आणि काळजीपूर्वक वापरल्यास ते वर्षानुवर्षे टिकू शकतात. तर प्लास्टिकचे कंटेनर तुटू शकतात, रंग बदलू शकतात आणि कालांतराने खराब देखील होऊ शकतात.
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्सने 1000 अंकांनी वाढला, ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना फायदा
स्वच्छता
काचेचे कंटेनर स्वच्छ करणे सोपे आहे. तुम्ही ते डिशवॉशरमध्ये देखील ठेवू शकता. याशिवाय काचेवर बॅक्टेरिया वाढत नाहीत, त्यामुळे ते स्वच्छ राहतात. त्या तुलनेत प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये डाग किंवा ग्रीस जमा होऊ शकतात, त्यामुळे ते टिफीन स्वच्छ करणे त्रासदायक बनते. काचेचे जेवणाचे डबे मायक्रोवेव्ह आणि ओव्हनमध्ये देखील सुरक्षित असतात. ते कोणत्याही धोक्याशिवाय गरम केले जाऊ शकतात, तर प्लास्टिकचे कंटेनर मायक्रोवेव्हमध्ये गरम करणे सुरक्षित नाही.
टीप : बातम्यांमध्ये दिलेली काही माहिती मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. कोणत्याही सूचना अंमलात आणण्यापूर्वी, तुम्ही संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.