Download App

कोविशील्डचा वाद अन् मोदींचा फोटो गायब?; स्पष्टीकरणानंतरही गोंधळ कायम

कोविशील्ड लस घेतलेल्यांना भविष्यात अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते अशी माहिती लस उत्पादक कंपनी AstraZeneca ने ब्रिटन न्यायालयात दिली आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Covishield vaccine controversy : कोविशील्ड लसीबाबत सुरू असलेल्या वादात कोरोना लसीकरण (Corona Vaccination Certificate) प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) फोटो अचानक काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे खरचं कोविशील्ड लसीचे दुष्परिणाम होणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. (Why PM Modi Photograph Missing From Corona Vaccination Certificate)

होय, कोरोनाची लस मोदींनीच तयार केली; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ठणकावले!

कोविशील्ड लस घेतलेल्यांना भविष्यात अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते अशी माहिती लस उत्पादक कंपनी AstraZeneca ने ब्रिटन न्यायालयात दिली आहे. त्यामुळे कोविशील्ड लस घेतलेल्या करोडो नागरिकांच्या मनातील धाकधूक वाढली असून, या चिंतेतच आता कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो अचानक गायब झाला आहे. त्यामुळे करोडो देशवासियांच्या मनात असंख्य प्रश्नांनी काहूर माजवलं आहे. पण मोदींचा फोटो कोविशील्ड लसीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या माहितीमुळे गायब झाला आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे यबद्दल आपण जाणून घेऊया.

Covishield लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या अन् हार्ट अटॅक! सर्वोच्च न्यायालयात याचिका, कंपनीचीही कबुली?

करोडो प्रमाणांपत्रावरू मोदी गायब

कोरोना महामारीच्या काळात लसीकरण झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते, ज्यावर तळाशी पंतप्रधान मोदींचा फोटो होता. तसेच या फोटोच्या खाली ‘Together, India will defeat COVID-19’ असे कॅप्शन दिले होते. मात्र, आता कॅप्शनमध्ये पीएम मोदींचा फोटो दिसत नाहीये त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो का काढला?

कोरोना लसीच्या पमाणपत्रावरून अचानक मोदींचा फोटो काढून टाकण्यात आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व गोंधळात आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सध्या देशभरात लोकसभेची धामधूम सुरू असून निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे. याचाच एक भाग म्हणून कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो काढून टाकण्यात आल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. पण, आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो येणार का? याबाबत मंत्रालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

हार्ट अ‍टॅकचा कोरोनाशी संबंध आहे का? पाहा आरोग्य मंत्री काय म्हणाले

मोदींचा फोटो गायब होण्याची ही पहिलीच वेळ नाही

कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. 2022 मध्ये गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधानांचा फोटो काढून टाकण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर आता संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकण्यात आला आहे. परंतु, आचारसंहिता संपल्यानंतर मोदींचा फोटो पुन्हा प्रमाणपत्रावर लावला जाणार का? याबाबत आरोग्य मंत्रालयाने कोणतीही माहिती दिलेली नाही.

follow us

वेब स्टोरीज