हार्ट अटॅकचा कोरोनाशी संबंध आहे का? पाहा आरोग्य मंत्री काय म्हणाले
नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला होता. आजवर कोरोनाचे अनेक व्हेरियंट देखील आले आहे. यातच कोरून आणि हृदयविकाराचा झटका (Heart Attack) यांचा काही संबंध आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. यावर आता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कोरोनाबाधित तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचा संबंध शोधण्यासाठी सरकारने संशोधन सुरू केले आहे आणि दोन-तीन महिन्यांत निकाल अपेक्षित आहेत, अशी माहिती मांडविया यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत दिली आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या देशात वाढू लागली आहे. यामुळे आरोग्य विभाग देखील सतर्क झाला आहे. हे सगळं सुरु असतानाच कोरोना बाधितांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रकार वाढू लागले असल्याचे समोर आले. याच अनुषंगाने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी महत्वाची माहिती दिली.
मांडविया म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. तसेच संभाव्य धोका पाहता आयसीयू बेड, ऑक्सिजन पुरवठा आणि इतर गंभीर काळजी व्यवस्था याची मुबलकता उपलब्ध करून ठेवण्यात आली आहे. दरम्यान आतापर्यंत तरी कोरोना काही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण करेल असे काही दिसत नाही, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष ‘या’ दिवशीपासून होणार सुरू
तरुण आणि निरोगी लोकांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याच्या वृत्तावर मांडविया यांनी एनडीटीव्हीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना मांडविया म्हणाले, आरोग्य मंत्रालय कोविडशी कोणत्याही संभाव्य संबंधाची चौकशी करत आहे. आम्ही अनेक तरुण कलाकार, क्रीडापटू, खेळाडू पाहिले… त्यांचा परफॉर्म करताना स्टेजवरच मृत्यू झाला. आम्ही सर्वांनी ते पाहिले आणि अनेक ठिकाणांहून अहवाल येऊ लागले. आम्हाला तपास करण्याची गरज आहे, ते पुढे म्हणाले.
तुम्हाला माहिती आहे का? गौतमीला कोणता खेळाडू आवडतो? पहा ती काय म्हणाली…
कोविड महामारीच्या संभाव्य चौथ्या लाटेवर, आरोग्य मंत्री म्हणाले की सतर्क राहण्याची गरज आहे. शेवटचे कोविड उत्परिवर्तन हे ओमिक्रॉनचे BF.7 सब-व्हेरियंट होते आणि आता XBB1.16 सब-व्हेरियंटमुळे संक्रमण वाढले आहे, ते म्हणाले, मंत्रालयाच्या अनुभवानुसार, उप-प्रकार फार धोकादायक नाहीत. जेव्हा जेव्हा नवीन प्रकार आढळतो, तेव्हा आम्ही ते लॅबमध्ये ओळखतो आणि वेगळे करतो. त्यानंतर आम्ही त्यावरील लसींच्या परिणामकारकतेचा अभ्यास करतो. आतापर्यंत, आमच्या लसींनी सध्याच्या सर्व प्रकारांवर काम केले आहे,” ते म्हणाले.