Download App

राज्यातील बेरोजगारीचे वास्तव ! पोलिस भरतीत एकापदासाठी तब्बल एक हजार तरुणांचे अर्ज

राज्यातील पोलीस दलात विविध 17 हजार रिक्त पदांसाठी भरती होत आहे. 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज प्राप्त झालेत.

  • Written By: Last Updated:

Police recruitment 2024 : लोकसभा निवडणुकीमुळे रखडलेल्या पोलीस भरतीचा (Police recruitment) मार्ग आता मोकळा झाला असून राज्यातील पोलीस दलात विविध 17 हजार रिक्त पदांसाठी भरती होत आहे. 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज प्राप्त झाले असून 19 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही, सिध्द करा; पंकजा मुंडेंचं सरकारला आव्हान 

अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर (Rajkumar Vatkar) यांनी या पोलीस भरतीबाबत सविस्तर माहिती दिली. पत्रकार परिषदेत बोलतांना व्हटकर यांनी सांगितलं की, लोकसभा निवडणुकीमुळे ही भरती होऊ शकली नाही. मात्र, 19 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. लेखी परीक्षा आणि मैदानी परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात घेतली जाईल. उमेदवार दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही. मात्र दोन वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करू शकतात, असं जाहिरातीत नमूद करण्यात आलं. विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मैदानी परीक्षा एकाच दिवशी होणार नाही. त्यांना यातून सूट नाही. शासनाने दिलेल्या आदेशानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, असं व्हटकर म्हणाले.

जगातील सर्वोत्कृष्ट शाळांच्या पात्रता यादीत पाच भारतीय शाळा; वेगळा प्रयोग केलेली मुंबईची शाळाही 

पुढं बोलतांना ते म्हणाले की, जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवू शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली असेल तर अश्या उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल. दरम्यान, उमेदवारांनी कोणत्याही आमीषास बळी पडू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

रायगड पोलीस दलात 422 रिक्त पदांसाठी 21 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होत आहे. यासाठी 31 हजार 63 उमेदवारांनी अर्ज केलेत. ही प्रक्रिया सुमारे 25 दिवस सतत सुरू राहणार आहे. पुणे शहर दलात भरती प्रक्रिया 19 जूनपासून सुरू होणार आहे. ड्रायव्हर आणि शिपाई या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. पुण्यात 202 जागांसाठी 21 हजार अर्ज दाखल झाले आहेत.

नगर जिल्ह्यातील पोलीस दलात 64 पदांसाठी भरती होत आहे. ही भरती 19 जून ते 29 जून या कालावधीत होणार आहे.

याशिवाय धाराशिव, चंद्रपुर, कोल्हापूर या जिल्ह्यांतही पोलीस भरीत होत आहे.

follow us

वेब स्टोरीज