Possibility of a cyberattack on Binance : जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजपैकी एक असलेल्या बायनान्सवर संभाव्य सायबर हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे क्रिप्टोकरन्सी बाजारात मोठं खळबळ उडाली असून बायनान्ससह इतर क्रिप्टो कंपन्यांनी तब्बल 2.54 अब्ज डॉलरची डिजिटल संपत्ती फ्रिज केली आहे. मात्र, या प्रकरणात वापरकर्त्यांच्या पैशांची प्रत्यक्ष चोरी झाली आहे की नाही, याबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. या प्रकरणात स्टेबलकॉइन जारी करणाऱ्या टेथर आणि सर्कल या कंपन्यांनी देखील कारवाई केली आहे. टेथरने सुमारे 1.57 अब्ज डॉलर, तर सर्कलने 80 कोटी डॉलरहून अधिक किमतीची संबंधित डिजिटल संपत्ती फ्रिज केली आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव बायनान्सने पैसे जमा करणे आणि काढणे म्हणजेच डिपॉझिट व विड्रॉलच्या सुविधा तात्पुरत्या स्वरूपात थांबवल्या आहेत.
29 ऑक्टोबर रोजी बायनान्सने संभाव्य सुरक्षा त्रुटींची माहिती दिली. कंपनीने संस्थापक चांगपेंग झाओ यांनी देखील या घटनेचा संभाव्य हॅकिंगशी संबंध असल्याचे म्हटले. मात्र, सायबर हल्ला नेमका कशा पद्धतीने झाला आणि त्यातून किती आर्थिक नुकसान झाले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. बायनान्सच्या सुरक्षा पथकाकडून या प्रकरणाचा तपस सुरू असून संशयास्पद व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी कंपनी कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि इतर क्रिप्टो कंपन्यांच्या संपर्कात आहे. संशयास्पद निधीचे पुढील हस्तांतरण रोखण्यासाठी संबंधित डिजिटल मालमत्ता फ्रिज करण्याची कारवाई करण्यात येत आहे. बायनान्सच्या माहितीनुसार, आतापर्यंत फ्रिज करण्यात आलेल्या डिजिटल संपत्तीचे एकूण सत्यापित मूल्य 2.54 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले आहे.
महायुतीत वादाची ठिणगी! नवनाथ बनांवर निलेश राणे आक्रमक, शिंदेंनी दिले नेत्यांना महत्त्वाचे आदेश
या घटनेनेनंतर बायनान्सच्या ग्राहकांमध्ये त्यांच्या खात्यातील पैसे सुरक्षित आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर कंपनीने ग्राहकांचे फंड पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. मात्र, सुरक्षा तपासणीचा भाग म्हणून पैसे जमा करणे आणि काढणे या सुविधा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, २.५४ अब्ज डॉलरची संपत्ती फ्रिज करण्यात आली म्हणजे एवढीच रक्कम चोरीला गेली आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. संशयास्पद व्यवहारांशी संबंधित निधीचा पुढील गैरवापर आणि हस्तांतरण रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. संशयास्पद व्यवहारांशी संबंधित निधीचा पुढील गैरवापर आणि हस्तांतरण रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती आर्थिक नुकसान झाले आणि या घटनेमागे नेमके कारण काय आहे, हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
शेतकऱ्यांचा अपमान भोवला! संजय गायकवाडांवर एकनाथ शिंदे संतापले, थेट पक्षातून निलंबनाचे आदेश?
दरम्यान, बायनान्सशी संबंधित सुरक्षा प्रकरणाचा परिणाम क्रिप्टोकरन्सी बाजारावरही पाहायला मिळाला. या बातमीनंतर प्रमुख डिजिटल चलनांच्या किमतीत घसरण झाली. बिटकॉइनची किंमत घसरून 77,646 डॉलर या सहा आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली. इथेरियमची किंमत 2,238.76 डॉलर या दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली. तर बायनान्सचे स्वतःचे टोकन असलेल्या BNB मध्ये 24 तासांत 8 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली आणि त्याची किंमत सुमारे 694 डॉलरपर्यंत खाली आली. हे आकडे घटनेनंतरच्या सुरुवातीच्या बाजारातील हालचाली दर्शवतात. क्रिप्टोकरन्सीच्या किमतींमध्ये वेगाने बदल होत असल्याने हे दर सध्याचे दर समजू नयेत.
एकूणच, जगातील आघाडीच्या क्रिप्टो एक्स्चेंजपैकी एक असलेल्या बायनान्सशी संबंधित संभाव्य सायबर हल्ल्याच्या घटनेने डिजिटल चलन बाजारात चिंता निर्माण केली आहे. ग्राहकांचे पैसे सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला असला, तरी प्रत्यक्षात किती नुकसान झाले, संशयास्पद व्यवहार कसे झाले आणि या घटनेमागे नेमके कारण काय आहे, याबाबत अधिकृत तपासाच्या निष्कर्षांची प्रतीक्षा आहे.
