PPF Investment Tips : आपल्याकडील पैशांची सुरक्षित गुंतवणूक व्हावी असे प्रत्येकालाच (PPF Investment Tips) वाटत असते. पब्लिक प्रोविडेंट फंड हा देखील (Public Provedent Fund) पैसे गुंतवणूकीचा एक सुरक्षित पर्याय आहे. या योजनेत अनेकांनी गुंतवणूक केली आहे. जर तुम्ही सुद्धा याच योजनेत गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक महिन्याची 5 तारीख अत्यंत महत्त्वाची असते.
जर तुम्ही एप्रिल महिन्याच्या 5 तारखेच्या आधी पैसे गुंतवणूक केली असेल तर त्या महिन्याचे पूर्ण व्याज तुम्हाला मिळेल. पण जर असे केले नाही तर व्याजाचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुमच्याकडे अजून दोन दिवसांचा वेळ आहे. या मुदतीत पैसे गुंतवणूक करून तुम्ही अधिक लाभ मिळवू शकाल. यामागचे गणित नेमके काय आहे हेच आज समजून घेऊ..
या योजनेत गुंतवणूक करण्याचा लोकांचा मुख्य उद्देश टॅक्स सेविंग असाच (Tax Saving) असतो. पण जर थोडा समजदारपणे विचार करून पैसे गुंतवणूक केली तर आधिक चांगला परतावा मिळवू शकाल. पहिले म्हणजे या योजनेत गुंतवणूक करत राहा. प्रत्येक वेळी पैसे 5 तारखेच्या आत जमा होतील एवढी काळजी मात्र नक्की घ्या. असे केल्याने तुम्हाला त्या पूर्ण महिन्याचे व्याज मिळत राहील.
PPF मध्ये गुंतवणुकीबरोबरच मॅच्युरिटी रक्कम आणि व्याज दोन्ही करमुक्त असतात. लाँग टर्ममध्ये सुरक्षित गुंतवणूक आणि मोठा निधी तयार करण्याचा हा चांगला मार्ग आहे. PPF खात्यातील गुंतवणूकीवर आयकर कायदा 80C नुसार दीड लाख रुपये कर वजावट (Tax Deduction) मिळते.
काय, उन्हाळ्यात तुमचाही लॅपटॉप गरम होतोय? मग ‘या’ टिप्स वापरून लॅपटॉप करा कुल
जर तुम्ही या योजनेत प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एकरकमी गुंतवणूक करत असाल तर 5 तारखेपर्यंत गुंतवणूक करणे जास्त फायदेशीर ठरू शकते. यामागे कारण आहे. PPF खात्यात प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या हिशोबाने व्याज कॅल्क्युलेशन केले जाते. म्हणजेच जर तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या 5 एप्रिलपर्यंत एकरकमी पैसे जमा केले तर तुम्हाला पूर्ण एप्रिल महिन्याचे व्याज मिळेल.
PPF खात्यात जर एखादा व्यक्ती महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे गुंतवणूक करत असेल तर त्याला जमा रकमेवर पूर्ण महिन्याचे सुद्धा व्याज मिळते. पण जर 5 तारखेनंतर गुंतवणूक करत असाल तर 5 ते 30 तारखे दरम्यान सर्वात कमी बॅलन्सवरच व्याज मिळेल.
PPF अकाउंटवर व्याजाचे कॅल्क्युलेशन मासिक आधारावर केले जाते. हे व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाते. उदा. जर तुम्ही यंदा 5 एप्रिलच्या आधीच तुमच्या PPF खात्यात दीड लाख रुपये जमा केले तर त्या महिन्याच्या व्याज गणनेसाठी पूर्ण जमा रकमेचा विचार केला जाईल. 7.5 टक्के दराने वर्षाचे 10 हजार 650 रुपये व्याज मिळेल. पण जर तुम्ही 5 तारखेनंतर व्यवहार पूर्ण केला तर तुम्हाला पहिल्या महिन्याचे व्याज मिळणार नाही. म्हणजेच एप्रिल महिना सोडून राहिलेल्या 11 महिन्यांवर व्याज मिळेल.
काही काम केलं नाही, तरी थकल्यासारखं वाटतंय? गंभीर आजाराचे लक्षण…