काय, उन्हाळ्यात तुमचाही लॅपटॉप गरम होतोय? मग ‘या’ टिप्स वापरून लॅपटॉप करा कुल

काय, उन्हाळ्यात तुमचाही लॅपटॉप गरम होतोय? मग ‘या’ टिप्स वापरून लॅपटॉप करा कुल

Laptop Care Tips in Summer : एप्रिल महिना सुरू झाला असून कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. या उन्हाच्या तडाख्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणे गरम होण्याची समस्या वारंवार उद्भवते. लॅपटॉप गरम होण्याचा अनुभव अनेकांना येतो. लॅपटॉप गरम झाला तर त्याचा परिणाम तत्काळ दिसून येतो. लॅपटॉप स्लो होतो. तसेच लॅपटॉपमधील अन्य उपकरणांचे नुकसान (Laptop Care Tips) होते. जर तुम्हाला सुद्धा असाच अनुभव येत असेल तर टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या आणि अनोख्या टिप्स सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही लॅपटॉप कुल ठेऊ शकता.

लॅपटॉप व्यवस्थित ठेवा

अनेकजण लॅपटॉपवर काम करत असताना लॅपटॉप चुकीच्या पद्धतीने ठेवतात. यामुळे ज्या ठिकाणावरून गरम हवा बाहेर निघते त्याठिकाणी अडथळे निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही लॅपटॉप अशा पद्धतीने सेट करा जेणेकरून लॅपटॉपच्या एग्जोस्ट समोर कोणताही अडथळा येणार नाही. जर एग्जोस्ट मागील बाजूने असेल तर लॅपटॉप भिंतीपासून किमान 6 ते 8 इंच दूर ठेवा. लॅपटॉपला एग्जोस्टच्या हिशोबाने ठेवल्यास लॅपटॉप जास्त गरम होणार नाही आणि त्याचा परफॉर्मन्स देखील कमी होणार नाही.

कुलिंग पॅडचा वापर करा

उन्हाळ्यात लॅपटॉप ओव्हर हिट होण्यापासून संरक्षित ठेवायचा असेल तर लॅपटॉप खाली अल्युमिनियम फॉइल शीट ठेवा. यामुळे उष्णता लवकर शोषली जाते. याव्यतिरिक्त तुम्ही लॅपटॉप थंड ठेवण्यासाठी कुलिंग पॅडचा वापर करू शकता. बाजारात अनेक प्रकारचे कुलिंग पॅड मिळतात. यात एक्स्ट्रा फॅन फिट केलेले असतात. यामुळे हवेचा प्रवाह अधिक चांगला होऊन लॅपटॉप थंड राहण्यास मदत मिळते.

बायोस अन् ड्राइवर्सना अपडेट करा

अनेकदा BIOS आणि सिस्टिम ड्राइव्ह मुळे सुद्धा लॅपटॉप होतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळेवर BIOS आणि ग्राफिक्स ड्राइव्ह अपडेट करत राहा. जेणेकरून फॅन योग्य पद्धतीने काम करत राहतील. प्रोसेसर सुद्धा जास्त गरम होणार नाहीत.

जास्त मीठ खाताय? तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते, ‘हे’ उपाय करा

थर्मल पेस्ट वेळोवेळी बदलत राहा

लॅपटॉपमधील प्रोसेसर आणि हिट सिंक मध्ये थर्मल पेस्ट लावलेला असतो. वेनेनुसार ही पेस्ट कोरडी होत जाते आणि कुलिंग इफेक्टला बऱ्याच प्रमाणात कमी करू शकते. अशा परिस्थितीत जर तुमचा लॅपटॉप 2 ते 3 वर्षे जुना झालेला असेल तर लॅपटॉप सर्विस सेंटरमध्ये घेऊन जा आणि यातील थर्मल पेस्ट बदलून घ्या. यामुळे लॅपटॉपचा वेग वाढेल आणि लॅपटॉप जास्त गरम देखील होणार नाही.

पावर सेटिंग्जही बदलत राहा

लॅपटॉप मधील पॉवर सेटिंग मध्ये काही आवश्यक बदल करून तुम्ही लॅपटॉपला जास्त गरम होण्यापासून वाचवू शकता. यासाठी लॅपटॉपमधील कंट्रोल पॅनलमधील पॉवर ऑप्शनमध्ये जाऊन Balanced Mode किंवा Battery Mode सिलेक्ट करावा लागेल. यामुळे लॅपटॉप आवश्यकतेपेक्षा जास्त पॉवरचा वापर करणार नाही. प्रोसेसर पॉवर मॅनेजमेंट मध्ये जाऊन Maximum Processor स्टेटला 80 ते 90 टक्क्यांपर्यंत लिमिटेड करून लॅपटॉप ओव्हर हिट होण्यापासून वाचवू शकता.

काय, तुम्ही अजूनही नवीन पॅनकार्ड घेतलं नाही का? टेन्शन घेऊ नका, ‘या’ पद्धतीने करा अर्ज

follow us
  • fb
  • instagram
  • youtube