काय, तुम्ही अजूनही नवीन पॅनकार्ड घेतलं नाही का? टेन्शन घेऊ नका, ‘या’ पद्धतीने करा अर्ज

काय, तुम्ही अजूनही नवीन पॅनकार्ड घेतलं नाही का? टेन्शन घेऊ नका, ‘या’ पद्धतीने करा अर्ज

PAN Card Applying Process : भारतात राहणाऱ्या भारतीय नागरिकांकडे काही महत्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे. या कागदपत्रांची आवश्यकता महत्वाच्या कामांसाठी पडते. बऱ्याचदा काम अडूनही पडते. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, मतदार कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड यांचा समावेश आहे. ही सर्व कागदपत्रे भारतात राहणाऱ्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाची आहेत. यात पॅनकार्ड जास्त महत्वाचे आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे पॅनकार्ड नसेल तर त्याची अनेक महत्वाची कामे खोळंबू शकतात.

मागील वर्षात भारत सरकारने पॅनकार्डच्या स्वरुपात महत्वाचा बदल केला आहे. सरकारने PAN 2.0 प्रोजेक्ट सुरू केला आहे. या प्रोजेक्ट अंतर्गतच पॅनकार्ड जारी केले जातील. जुने पॅनकार्ड देखील बदलण्यात येत आहेत. जर तु्म्हाला नवीन पॅनकार्ड मिळाले नसेल तर यासाठी नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. केंद्र सरकार स्वतःच तुम्हाला PAN 2.0 तुमच्या पत्त्यावर पाठवून देईल. यासाठी तुमच्याकडून कोणते चार्जेस देखील घेतले जाणार नाहीत.

काम की बात! क्रेडिट कार्ड बंद करताय मग, CIBIL स्कोअरही कमी होणार?, जाणून घ्या गणित…

केंद्र सरकारकडून जारी करण्यात येणारे PAN 2.0 कार्ड आधीच्या PAN 1.0 ची जागा घेणार आहे. PAN 2.0 अंतर्गत जारी केले जाणारे पॅनकार्डमध्ये क्यूआर कोड देखील आहे. यामुळे या कार्डची सुरक्षितता हायटेक होते.

जर तुम्ही अजूनही नवीन पॅनकार्ड घेतलेले नसेल तर काळजी करू नका. यासाठी तुम्ही फक्त तुमच्या जवळच्या एखाद्या पॅन सर्व्हिस सेंटरमध्ये जा. याठिकाणी तुम्ही नवीन पॅनकार्डसाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया करावी लागेल. मोबाइल व्हेरिफिकेशन करावे लागेल. आधारकार्ड नंबर द्यावा लागेल. तसेच काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. तसेच नाममात्र शुल्क द्यावे लागेल.

तसेच तुम्ही नवीन पॅनकार्डसाठी ऑनलाइन अर्जही करू शकता. यासाठी आयकर विभागाच्या https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/instant-e-pan या पोर्टलवर जाऊन तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.

PPF की SIP कुठून होईल बक्कळ कमाई? फायद्याचं गणित समजून घ्या पटकन..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube