नवी दिल्ली : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार (Rape) आणि हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. यानंतर देशभरातील असंख्य डॉक्टरांनी रस्त्यावर उतरत न्यायाची मागणी केली आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर कोलकाता पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली आहे. तर, कोलकत्ता उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात खून करण्यापूर्वी पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व घडामोडींमध्ये NCRB चा एक अहवाल समोर आला आहे. यात अनेक धक्कादायक गोष्टी नमुद करण्यात आल्या आहेत त्यामुळे भारतात खरच महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. (A Rape Every 16 Minutes Latest NCRB Report)
Video : विधानसभेच्या जागा वाटपापूर्वीच भुजबळांनी शड्डू ठोकला; सांगून टाकला मतदारसंघ
NCRB च्या अहवालात काय?
एनसीआरबीच्या अहवालानुसार, पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून होणारे अत्याचार, अपहरण, हल्ले किंवा बलात्कार’ यासारख्या महिलांवर होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठा वाटा असल्याचे धक्कादायक निरीक्षण नोंदवले आहे. एवढेच नव्हे तर, भारतात दर 16 मिनिटाला एका महिलेवर बलात्काराची घृणास्पद घटना घडत असल्याचेही नमुद करण्यात आले आहे.
महिलांवरील गुन्ह्यांची वाढती प्रकरणे चिंताजनक
NCRB च्या अहवालात 2022 मध्ये भारतात महिलांविरुद्ध 4,45,256 प्रकरणे नोंदवण्यात आली होती, जी दर तासाला 51 प्रकरणांच्या समतुल्य आहे. 2012 च्या दिल्ली घटनेच्या आसपासच्या वर्षांमध्ये NCRB ने संपूर्ण भारतात दरवर्षी 25,000 बलात्काराच्या घटनांची नोंद केली. तेव्हापासून ही संख्या सातत्याने वाढत असून, 2016 मध्ये जवळजवळ 39,000 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. कोविडच्या काळात ही आकडेवारी कमी झाली होती. पण आता पुन्हा महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे.
Doctor Rape Case : कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणाचा पोस्टमार्टम रिपोर्ट; धक्कादायक गोष्टी उघड
2012 मध्ये दिल्लीत एका 23 वर्षीय महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर महत्त्वपूर्ण कायदेशीर सुधारणा झाल्या. मात्र, त्यानंतरही महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची आकडेवारी आणि वास्तव भीषण आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) अलीकडील अहवालात भारतातील महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक असल्याचेच चित्र आहे.
गृह मंत्रालयाचं मोठं पाऊल; दर दोन तासांनी पोलिसांना द्यावा लागणार रिपोर्ट, कोलकाता घटनेनंतर निर्णय
सरकारी अहवालानुसार, 2018 मध्ये सरासरी दर 15 मिनिटांना एका महिलेवर बलात्काराची नोंद करण्यात आली होती. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2018 ते 2022 या काळात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण 27 ते 28 टक्के इतके कमी आहे. गंभीर गुन्ह्यांसाठी हा दुसरा सर्वात कमी दर आहे, ज्यामध्ये खून, अपहरण, दंगल आणि गंभीर दुखापत यांचा समावेश होतो.