NCRB Report 2022 : महाराष्ट्रात सर्वाधिक दंगली, वर्षभरात 8 हजार गुन्ह्यांची नोंद

  • Written By: Published:
NCRB Report 2022 : महाराष्ट्रात सर्वाधिक दंगली, वर्षभरात 8 हजार गुन्ह्यांची नोंद

National Crime Records Bureau Report 2022 : पुरोगामी आणि सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्य आता देशात दंगलीच्या (Riot) बाबतीत अव्वल असल्याचं समोर आलं. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) च्या अहवालानुसार, 2022 मध्ये महाराष्ट्रात दंगलीचे 8 हजार 218 गुन्हे दाखल झाले आहेत. खुनाच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून राज्यात पॉक्सो गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आलं. त्यामुळं राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे.

कांदा अन् ऊसाच्या दरावर PM मोदींचे घाव! दगाफटका टाळण्यासाठी फडणवीस-अजितदादा अ‍ॅक्शनमध्ये

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारणांमुळे दंगलीच्या घटना समोर आल्या आहेत. आता नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) दंगलीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचं म्हटलं. 2022 मध्ये देशात सर्वाधिक दंगलीच्या घटनांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. तर दंगलीच्या घटनांमध्ये महाराष्ट्रानंतर बिहार आणि उत्तर प्रदेशाचा नंबर लागतो. NCRB च्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये महाराष्ट्रात 8 हजार 218 दंगलीचे गुन्हे दाखल झाले. ज्यामध्ये राज्यातील 9 हजार 558 नागरिक दंगलीमुळं प्रभावित झाले. तर बिहार दुसऱ्या क्रमांकावर असून, गेल्या वर्षी बिहारमध्ये दंगलीचे 4 हजार 736 गुन्हे दाखल झाले होते. तर उत्तर प्रदेशात दंगलीचे 4 हजार 478 गुन्हे दाखल झालेत.

Supreme Court चा निर्णय म्हणजे अखंड भारत…; कलम 370 वैध ठरल्यावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया 

देशात एकूण झालेल्या दंगलीच्या प्रकरणांपैकी 28 प्रकरणे जातीय आणि धार्मिक मुद्द्यांशी संबंधित आहेत, 75 प्रकरणे राजकीय मुद्द्यांशी संबंधित आहेत आणि 25 प्रकरणे जातीय संघर्षाशी संबंधित आहेत.

खूनांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र नंबर 3 वर
उत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये सर्वाधिक 3,491 हत्या झाल्या. या यादीत बिहार दुसऱ्या क्रमांकावर असून 2,930 गुन्हे दाखल आहेत. तर महाराष्ट्रात 2,295 खुनाचे गुन्हे दाखल आहेत

पोक्सोचे राज्यात 20,762 गुन्ह्यांची नोंद
NCRB ने जारी केलेल्या अहवालानुसार, 2022 मध्ये महाराष्ट्र बाल शोषण गुन्ह्यांतर्गत (POCSO) महाराष्ट्रात सर्वाधिक 20,762 गुन्हे दाखल झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मध्य प्रदेशात पोक्सोचे 20,415 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश 18,682 गुन्हे, राजस्थान 9,370; पश्चिम बंगालमध्ये 8950 गुन्हे दाखल झालेत.

महिलांवरील गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ

दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. NCRB च्या वार्षिक अहवालात भारतात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले. 2022 मध्ये 4 लाख 45 हजार 256 गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजे दर तासाला महिलांविरोधात 51 गुन्हे दाखल झाले. महिलांवरील बहुतांश गुन्ह्यांमध्ये पती किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अत्याचार झाल्याचे समोर आले असून, त्यांची संख्या 31.4 टक्के आहे. त्यानंतर महिलांच्या अपहरणाचे 19.2 टक्के गुन्हे दाखल झाले आहेत. 18.7 टक्के विनयभंगाची गुन्हे, तर 7.1 टक्के बलात्काराची प्रकरणे नोंंदवण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube