Download App

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरीची संधी,  133 सहाय्यक प्राध्यापकांची कंत्राटी भरती 

  • Written By: Last Updated:

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) रखडलेल्या प्राध्यापक भरतीला (Professor recruitment) आता मुहूर्त मिळणार आहे. 133 सहायक प्राध्यापकांची (Assistant Professors) भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार असल्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांची 31 मे 2024 पर्यंत नियुक्ती केली जाईल. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै आहे. (recruitment of 133 assistant professors in Savitribai Phule Pune University Last date 20 july)

पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. मागील गेल्या अनेक दिवसांपासून ही प्राध्यापक भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. अनेक विभागांमध्ये प्राध्यापक नसल्यामुळे अध्यापनाचा भार मोजक्याच प्राध्यापकांवर पडतो. विद्यापीठात प्राध्यापकांची ५५ टक्के पदे रिक्त आहेत. या जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी होती. यासोबतच शासनाने शिक्षक भरती प्रक्रिया न राबविल्याने शैक्षणिक कामकाज ठप्प झाले होते. दरम्यान, देशातील विद्यापीठांच्या यादीतही विद्यापीठाच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. त्यात आता नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळेच विद्यापीठ प्रशासनाने अखेर प्राध्यापकांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. सहाय्यक प्राध्यापकांची 133 पदे भरण्यात येणार आहेत. गेल्या वर्षीही विद्यापीठाने विद्यापीठ निधीतून कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली. आता या वर्षीही ही भरती होणार आहे.

…तर गडकरींना भाषण करु देणार नाही; चंद्रकांतदादा असं का म्हणाले? वाचा सविस्तर
या भऱती संदर्भात विद्यापीठाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. ही भरती विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा, मानव्यविज्ञान, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील चाळीस शैक्षणिक विभागांमधील पदांसाठी राबवली जाणार आङे.  या सहायक प्राध्यापक पदांसाठी महिन्याला चाळीस हजार रुपये पगार  दिला जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांची 31 मे 2024 पर्यंत नियुक्ती केली जाईल. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै आहे. भरती प्रक्रियेअंतर्गत आरक्षणनिहाय जागा, पात्रता, अटी व शर्तींची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Tags

follow us