…तर गडकरींना भाषण करु देणार नाही; चंद्रकांतदादा असं का म्हणाले? वाचा सविस्तर
Rohit Pawar On Nitesh Rane : देशाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुढील महिन्यात पुण्यातील चांदणी चौकातील कामाच्या उद्घाटनासाठी येणार आहे. त्याआधी पुण्याचे पालकमंत्री नितीन गडकरी यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये चंद्रकांतदादांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना गडकरींच्या कार्यक्रमाला चागंली गर्दी जमावण्याचे आदेश दिले आहे.
पुण्यातील चांदनी चौकातील पुलामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणावर ट्रफिकजाम होत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या भागाची पाहणी केली होती. त्यानंतर तो पुल पाडण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या पुलाची पाहणी केली होती. त्यानंतर आता येथे झालेल्या नवीन बांधकामाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा यांनी या उद्घाटनस्थळाची पाहणी करत कार्यकर्त्यांना गडकरींच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवण्याचे आदेश दिले आहे.
Chandrayaan-3 : याला म्हणतात भारतीय संस्कृती! झोमॅटोने ISRO ला पाठवली खास डिश
चंद्रकांतदादा म्हणाले की, या जागेवर 5 हजार लोकं बसतात. एवढे लोक आणण्याची जबाबदारी तुमची आहे. ते गडकरी आहेत, वरुन दुर्बिनने पाहतात. मागे देवेंद्रजींच्या कार्यक्रमाला 3 हजार संख्या होती. या कार्यक्रमासाठी 5 हजार लोक मी मोजून घेणार. जर तेवढे लोक नसले तर गडकरींना सांगणार की उद्घाटन करा मात्र भाषण करु नका, असे चंद्रकांतदादा म्हणाले.
‘तुमच्या फालतु कुटनितीमुळे लोक तुम्हाला कुटून खातील’; राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात
पुढील महिन्यात या कामाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय रस्ते वाहुक मंत्री नितीन गडकरी हे स्वत येणार असल्याने चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांन या सूचना केल्या आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित रहावे, यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहे.