Download App

करोडपती व्हायचंय? मग, वाट का पाहता फक्त ‘हा’ सोपा फॉर्मुला फॉलो कराच!

चांगला परतावा आणि योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी अनेक जण हा फॉर्मुला वापरतात. या माध्यमातून पैसे गुंतवणूक करतात.

Investment Tips : आजच्या काळात प्रत्येकालाच वाटतं की आपल्याकडे कोट्यावधींची संपत्ती असावी. यासाठी बचत आणि गुंतवणूक (Investment Tips) याकडे लक्ष दिले जाते. पण या माध्यमातून आपण कधी कोट्यधीश होऊ याची माहिती त्याला नसते. अशा वेळी जर एखादा फॉर्मुला वापरून किती कालावधीत कोट्यधीश होऊ हे समजलं तर.. चला तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका फॉर्म्युल्याची माहिती देणार आहोत जो तुम्हाला करोडपती होण्यात नक्कीच मदत करू शकतो.

फॉलो करा 8-4-3 फॉर्मुला

चांगला परतावा आणि योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी अनेक जण हा फॉर्मुला वापरतात. या माध्यमातून पैसे गुंतवणूक केल्यास किमान 12 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. हा फॉर्म्युला अतिशय सोपा आहे. यानुसार तुम्हाला अशा एखाद्या स्कीम मध्ये गुंतवणूक करावी लागेल ज्यामध्ये दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळत असेल. आज बाजारात अशा अनेक योजना आहेत ज्या चक्रवाढ पद्धतीने व्याज ऑफर करतात.

होम लोनचा हप्ता कमी करायचाय? मग, ‘या’ 5 टिप्स नक्कीच करतील मदत

किती वर्षात होताल करोडपती

जर तुम्ही या योजनेत दरमहा 21 हजार 250 रुपये गुंतवणूक करत असाल तर 8 वर्षात 33 लाख 37 हजार रुपयांचा फंड तयार होईल. तुमच्या करोडपती बनण्याचा हा पहिला टप्पा आहे. आता पुन्हा चक्रवाढ पद्धतीने तुम्ही पुढील चार वर्षांत 33.37 लाख रुपये जमा करताल. त्यानंतर फक्त तीन वर्षांत तुमच्या फंडात आणखी 33 लाख रुपये जोडले जातील. अशा पद्धतीने फक्त 15 वर्षांत तुम्ही 8+4+3 नियमानुसार तुम्ही कोट्यधीश होताल.

जर तुम्ही 15 वर्षानंतर आणखी सहा वर्षे 21 हजार 250 रुपये दर महिन्याला गुंतवणूक करत राहिलात तर एकूण 21 वर्षांत तुमच्याकडे 2 कोटी 22 लाख रुपये जमा होतील.

कंपाऊंड व्याजदराची कमाल

या फॉर्म्युलाच्या मदतीने मोठा फंड तयार करण्यात कंपाऊंड व्याज दराचेही मोठे योगदान आहे. अल्बर्ट आईनस्टाईन यांनी कंपाऊंड इंटरेस्टला जगातील आठवे आश्चर्य म्हणून संबोधले होते. तसं पाहिलं तर गुंतवणुकीवर दोन पद्धतीने व्याज मिळते. साधारण व्याज आणि चक्रवाढ व्याज. साधारण व्याजमध्ये केवळ मुद्दल म्हणजेच गुंतवणूक केलेल्या रकमेवर व्याज मिळते. पण चक्रवाढ व्याज पद्धतीत मूळ रकमेवर व्याज दिले जाते. आणि पुढे मूळ रकमेत हे व्याज देखील जोडले जाते. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर यामध्ये व्याजावर व्याज मिळते.

Government Schemes : बचत गट महिला समृध्दी कर्ज योजना आहे तरी काय?

follow us