Download App

होम लोनचा हप्ता कमी करायचाय? मग, ‘या’ 5 टिप्स नक्कीच करतील मदत

घर खरेदी करण्याआधी डाऊन पेमेंटसाठी मोठी रक्कम आधीच जमा केली पाहिजे. जितके जास्त डाऊन पेमेंट भराल तितका तुमचा हप्ता कमी राहिल.

Home Loan EMI : होम लोन घेतल्यानंतर सर्वात मोठी काळजी असते ती म्हणजे या कर्जाच्या हप्त्यांची. जर वेळेवर हप्ते भरले गेले नाहीत तर बँकांकडून भरमसाठ दंड आकारला जातो. सिबिल स्कोअरही खराब होतो. कर्जाचे हप्ते देखील बराच काळ भरावे लागतात. त्यामुळे प्रत्येकालाच वाटतं की लवकरात लवकर या हप्त्यांचा ताण कमी व्हावा. चला तर मग जाणून घेऊ अशा काही खास टिप्स ज्यामुळे तुम्ही तुमच्या कर्जाचा EMI कमी करू शकता.

डाऊन पेमेंट जास्त भरा

घर खरेदी करण्याआधी डाऊन पेमेंटसाठी मोठी रक्कम आधीच जमा केली पाहिजे. तुम्ही जितके जास्त डाऊन पेमेंट भराल तितका तुमचा हप्ता कमी राहिल. घराच्या एकूण किंमतीच्या किमान 25 टक्के रक्कम तु्म्ही डाऊन पेमेंट म्हणून भरली पाहिजे. जर तुमच्या घराची किंमत 40 लाख रुपये असेल तर तुम्ही किमान 10 लाख रुपये डाऊन पेमेंट भरायला हवे.

प्री पेमेंटही चांगला पर्याय

जर तुम्हाला एकाचवेळी जास्त पैसे मिळाले असतील तर या पैशांतून तुम्ही गृहकर्जाचे प्री पेमेंट करू शकता. यामुळे तुमच्या कर्जाची मुद्दल कमी होते. कर्जाचा हप्ता आणि कालावधी कमी होतो. कर्जाचा कालावधी कमी झाल्याने तुमचे टेन्शनही बऱ्यापैकी कमी होईल. तसेच तुम्हाला कर्जावरील व्याजही कमी द्यावे लागेल.

गंभीर आजारांपासून मिळेल संरक्षण; जाणून घ्या, काय आहे क्रिटिकल इलनेस कव्हर?

होम लोन ट्रान्सफर

जर तुमचे कर्ज फेड करण्याचे रेकॉर्ड चांगले असेल तर तुम्ही कमी व्याजदर आकारणाऱ्या बँका किंवा वित्तीय संस्थांकडे तुमचे कर्ज हस्तांतरीत करू शकता. हा पर्याय चांगला राहिल. पण होम लोन ट्रान्सफर करण्याआधी किती पैसे खर्च करावे लागतील याची माहिती जरूर घ्या. कारण होम लोन ट्रान्सफरच्या नावाखाली बँका आणि वित्तीय संस्था मोठी रक्कम वसूल करतात.

होम लोन ओव्हरड्राफ्ट सुविधा

तुम्ही होम लोन ओव्हरड्राफ्ट सुविधेचाही वापर करू शकता. या अंतर्गत तुम्ही कर्जाच्या हप्त्या व्यतिरिक्त कर्जाच्या खात्यात अतिरिक्त रक्कम जमा करू शकता. यामुळे व्याज कमी होईल कर्जाचा कालावधीही कमी होईल. कर्ज लवकरात लवकर मिटवण्याचा हा एक चांगला पर्याय ठरतो.

फ्लोटिंग रेट लोन निवड करा

होम लोन घेताना फ्लोटिंग रेटचा पर्याय निवडणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. या प्रकारात व्याजदर बाजारातील परिस्थितीनुसार बदलत राहतो. जर बाजारात व्याजदर कमी झाला तर तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होईल. परंतु, जर व्याजदर जर वाढले तर कर्जाचा हप्ता देखील वाढेल. हा एक धोका यात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडताना काळजीपूर्वक विचार करा. कारण या प्रकारात तुमचा कर्जाचा हप्ता दर महिन्याला समान राहिलच असे नाही.

काम की बात! रिटायरमेंटसाठी कशी कराल बचत? कुठे गुंतवाल पैसा? वाचा सविस्तर..

follow us