काम की बात! रिटायरमेंटसाठी कशी कराल बचत? कुठे गुंतवाल पैसा? वाचा सविस्तर..

काम की बात! रिटायरमेंटसाठी कशी कराल बचत? कुठे गुंतवाल पैसा? वाचा सविस्तर..

Retirement Planning Tips : रिटायरमेंटसाठी तुम्ही जितक्या लवकर नियोजन करताल तितके तुमच्यासाठी फायद्याचे राहिल. बहुतांश आर्थिक तज्ज्ञ वयाच्या 30 वर्षापासून रिटायरमेंट प्लॅन (Retirement Plan) सुरू करावा असा सल्ला देतात. यामुळे तुम्ही मोठा रिटायरमेंट फंड तयार करू शकाल. तसेच वृद्धापकाळात तुम्हाला पैशांसाठी कुणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. रिटायरमेंट नंतर तुमच्या गरजा काय असतील हे सर्वात आधी ठरवावं लागेल. तसेच तुमची लाईफस्टाईल कशी असेल याचा देखील विचार करावा लागेल. म्हणजे मग तुम्हाला या पद्धतीने बचत करता येईल. म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपी, पीपीएफ आणि एनपीएस यांसारख्या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.

रिटायरमेंटसाठी बचत कशी कराल?

अनावश्यक खर्च आधी कमी करा आणि पैशांची बचत करण्यावर जास्त लक्ष केंद्रित करा.

जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर आधी हे कर्ज मिटवण्याचा प्रयत्न करा.

एकाच वेळी मोठी रक्कम बचत करण्याची गरज नाही. थोडे थोडे पैसे बाजूला टाकूनही काही काळात तुम्ही मोठा फंड उभा करू शकता.

रिटायरमेंट फंडाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तुम्ही करत असलेल्या गुंतवणुकीचा नियमित आढावा घेत रहा.

Home Loans Subsidy : मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; होम लोनवर 9 लाख रुपयांपर्यंत सबसिडी

महागाईचा विचार करून गुंतवणूक करा

महागाई म्हणजे वार्षिक आधारावर वस्तूंचे (Inflation) दर कशा पद्धतीने वाढत आहेत. भारतात सध्या महागाई 5 टक्क्यांच्या आसपास आहे. पण 1974 मध्ये हा दर 28 टक्क्यांच्या पुढे गेला होता. म्हणूनच जास्त परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

रिस्क मॅनेजमेंटचा विचार करा

रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करताना रिस्क मॅनेजमेंटचा सुद्धा विचार केला पाहिजे. तुम्ही तुमच्या बचतीची सर्व रक्कम कोणत्या एकाच योजनेत गुंतवणूक करू नका. ही रक्कम वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून गुंतवणूक करा. काही पैसे शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करू शकता. चांगला परतावा देणारे स्टॉक खरेदी करू शकता.

म्युच्युअल फंडात (Mutual Fund) एसआयपी देखील कर्ज शकता. काही पैसे सरकारी योजनांमध्ये देखील गुंतवू शकता. यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळण्याची खात्री राहते. सोने किंवा रियल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचाही पर्याय आहे. तसेच पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही एखाद्या आर्थिक सल्लगाराचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सोने खरेदी का महत्त्वाची? ‘ही’ पाच कारणं ओळखा अन् सोन्यात गुंतवणूक कराच!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube