रोबोट्स स्वत: च निर्णय घेणार अन् जगात उलथापालथ होणार! 2030 साल कल्पनेच्या बाहेर असणार

रोबोट्स स्वत: च निर्णय घेणार अन् जगात उलथापालथ होणार! 2030 साल कल्पनेच्या बाहेर असणार

Robots decisions will turned world upside down 2030 will be beyond imagination : आजच्या युगाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग म्हटलं जात. त्यामुळे गेल्या काही पिढ्यांनी विचारही केला नव्हता. अशा अनेक गोष्टी तंत्रज्ञानाने शक्य केल्या आहेत. त्यामुळे आजच्या पिढीचं जगणं सुकर आणि सोयीसुविधांनी युक्त असं झालं आहे. दररोज नवनवीन टेक्नॉलॉजींचा शोध लागत आहे. त्याचे अनेकदा तोटे देखील समोर येतात. त्यातच आता 2030 पर्यंत तंत्रज्ञानाच्या आणखी काही गोष्टींचा शोध लागेल. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही गोष्टी घडतील. ज्याची कल्पना देखील आण केलेली नसेल. कोणत्या आहेत या टेक्नॉलॉजी? त्यामुळे काय-काय घडणार जाणून घेऊ सविस्तर…

पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण; ‘चित्रपताका’ नावाने होणार महोत्सव

रोबोट्स निर्णय घेणार…

असं सांगितलं जात आहे की, भविष्यात तंत्रज्ञान एवढं विकसित होणार आहे की, रोबोट केवळ सांगितलेली काम करणार नाही तर तो स्वत: निर्णय देखील घेणार आहे. कारखाने, हॉस्पिटल्स आणि लॉजिस्टीक्स यासारख्या क्षेत्रात असे स्मार्ट तयार केले जात आहेत. जे परिस्थितीनुसार तात्काळ निर्णय घेऊ शकतील. स्टॅटीस्टा या संस्थेच्या रिपोर्टनुसार 2030 पर्यंत रोबोटिक्सचा बाजार 250 अरब डॉलरच्या पुढे जाणार आहे.

रोहित पवारांना अविश्वास प्रस्ताव मान्य, त्यांनी शब्द पाळला नाही; राम शिंदेंचा हल्लाबोल

स्पेशल कम्प्युटींग

स्पेशल कम्प्युटींग म्हणजे डिजिटल जगाला आपल्या खऱ्या जगाशी मिळवणे. जेणे करूण आभासी जग आणि खरं जग यात कोणताही फरक राहणार नाही. यासाठी सेन्सर, कॅमरा आणि अनेक अॅडव्हान्स प्रोसेसिंगचा वापर केला जाणार आहे. 2030 पर्यंत स्पेशल कम्प्युटींगचा बाजार 100 अरब डॉलरच्या पुढे जाणार आहे. गेमिंग, व्हर्चुअल मीटिंग आणि रिमोट वर्किंग यासारख्या क्षेत्रांत मोठा बदल होणार आहे.

‘या’ आजाराचा भारतात धोका वाढला… सुटका कशी मिळवायची?

एआय टू एआय कम्युनिकेशन

आज आपण एआयच्या सहाय्याने चॅटबॉट्स या व्हाईस असिस्टंटच्या माध्यमातून बोलू शकतो. मात्र भविष्यात AI सिस्टीम स्वत: च स्वत: शी बोलू शकणार आहे. ज्यामध्ये माणसांना कोणत्याही कमांड देण्याची देखील आवश्यकता नसेल. ज्यामध्ये डिलीव्हरी ड्रोन हवामान किंवा ट्रॅफिकच्या माहितीनुसार त्याचा मार्ग बदलू शकणार आहे.

एआय TRiSM

जगभरात एआयचा वापर अत्यंत गतीने वाढत आहे. त्यात एआय TRiSM एक नवी दिशा आहे. जी एआय सिस्टीममधील जोखिमांवर काम करून त्यावर उपाययोजना करणार आहे. ज्यामध्ये बायस, प्रायव्हसी ब्रीच आणि सिक्युरिटी कमतरतांचे मूल्यांकन करून त्यावर उपाययोजना करणार आहे. येणाऱ्या काळात कंपन्यांसाठी हे टूल अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

क्वांटम कम्प्युटींग इंटीग्रेशन

क्वांटम कम्प्युटींग इंटीग्रेशन हे एक असे तंत्रज्ञान आहे. जी अत्यंत जटील समस्या क्षणात सोडवू शकणार आहे. या सिस्टीमला एआयशी जोडल्यास
डेटा प्रोसेसिंगची ताकद अनेक पटींना वाढणार आहे ताकत कई गुना बढ़ जाएगी. 2030 पर्यंत क्वांटम कम्प्युटींग इंटीग्रेशनचा बाजार 15 अरब डॉलरच्या पुढे जाणार आहे. यामुळे फायनान्स, हेल्थ आणि सायबर सिक्युरिटी यासारखे क्षेत्रांत मोठा बदल होणार आहे.

5G/6G नेटवर्कसह एज कम्प्युटींग

एज कम्प्युटींग म्हणजे डेटा तेथेच प्रोसेस करणे जेथून तो प्राप्त करण्यात आला आहे. त्यामुळे कमी वेळात जास्त वेगात काम करता येणार आहे. त्याला जेव्हा जब 5G/6G नेटवर्क जोडलं जाईल तेव्हा तर रियल-टाईम अनुभव आणि आणखी सुबक काम होणार आहे. त्यामुळे तुमचे डिव्हाइसेस विना इंटरनेटचे देखील वेगात आणि स्मार्ट निर्णय घेऊ शकणार आहे.

बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटीक इंजिनिअरिंग अॅडव्हान्सेस

CRISPR यांसारख्या टेक्नॉलॉजींच्या माध्यमातून DNA ला अत्यंत सुबक आणि योग्य पद्धतीने एडीट करता येणार आहे. ज्यामुळे विविध गंभीर आजारांवरील उपचार करणं सोप होणार आहे. तसेच ही सिस्टीम निर्णय घेण्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. असं सांगितलं जात आहे की, 2030 पर्यंत बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटीक इंजिनिअरिंग अॅडव्हान्सेसचा बाजार 250 अरब डॉलरच्या पुढे जाणार आहे. ज्यामुळे हेल्थकेअर आणि फूड सिक्युरिटी क्षेत्रात मोठा बदल होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube