6 कोटी लोकांसाठी गुडन्यूज! आता PPF खात्यात नॉमिनी अपडेशन मोफत; केंद्र सरकारचा निर्णय

6 कोटी लोकांसाठी गुडन्यूज! आता PPF खात्यात नॉमिनी अपडेशन मोफत; केंद्र सरकारचा निर्णय

PPF Nominee Updation : केंद्र सरकारने गुरुवारी मोठा निर्णय घेत पीपीएफ खातेधारकांना (PPF Nominee) दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात म्हटले आहे की पीपीएफ खात्यांत नॉमिनी अपडेशन करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. या निर्णयामुळे देशभरातील किमान 6 कोटी खातेधारकांना याचा लाभ होणार आहे.

पीटीआयनुसार सरकारने नोटिफिकेशनच्या माध्यमातून पीपीएफ खात्यात नॉमिनी जोडण्याच्या नियमांत बदल केले आहेत. पीपीएफ खात्यांत नॉमिनी डिटेल्स अपडेट करण्यासाठी काही आर्थिक संस्थांकडून पैसे घेतले जात होते. पण आता हे काम अगदी मोफत होणार आहे असे अर्थमंत्री यांनी त्यांच्या ट्विटर वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयाची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी एक अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. 2 एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की PPF Account मध्ये नॉमिनी अपडेशनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सरकारी बचत संवर्धन सामान्य नियम 2018 मध्ये हा बदल करण्यात आला आहे. याआधी सरकार द्वारे संचालित केल्या जाणाऱ्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये नॉमिनी कॅन्सल करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात येत होते.

PPF मध्ये गुंतवणुक करताय? मग, 5 एप्रिल लक्षात ठेवाच; जाणून घ्या नफ्याचं सोप्पं गणित..

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोटिफिकेशन देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या निर्णयाबरोबरच नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या बँकिंग अमेंडमेंट बिल 2025 अंतर्गत पीपीएफ खातेधारकांना जमा पैसे, सुरक्षित ठेवलेले सामान आणि लॉकरसाठी 4 नॉमिनी जोडण्याची सुविधा देण्यात आली आहे.

सेफ गुंतवणुकीचा पर्याय पीपीएफ

पीपीएफ मध्ये बहुतांश गुंतवणूक टॅक्स सेविंगच्या उद्देशानेच केली जाते. यामध्ये गुंतवणुकीसह मॅच्युरिटी रक्कम आणि व्याज दोन्ही करमुक्त असतात. लाँग टर्म मध्ये सुरक्षित गुंतवणूक आणि मोठा निधी उपलब्ध करण्याचा हा चांगला मार्ग आहे. पीपीएफ खात्यात गुंतवणुकीवर आयकर कायदा 80C नुसार दीड लाख रुपयांची कर वजावट मिळते. पीपीएफ खात्यातील गुंतवणुकीवर सरकारकडून 7.1 टक्के व्याज दिले जाते.

गुंतवणुकीसाठी 5 तारीख एकदम खास

जर तुम्ही या योजनेत प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एकरकमी गुंतवणूक करत असाल तर 5 तारखेपर्यंत गुंतवणूक करणे जास्त फायदेशीर ठरू शकते. यामागे कारण आहे. PPF खात्यात प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या हिशोबाने व्याज कॅल्क्युलेशन केले जाते. म्हणजेच जर तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या 5 एप्रिलपर्यंत एकरकमी पैसे जमा केले तर तुम्हाला पूर्ण एप्रिल महिन्याचे व्याज मिळेल.

Investment : करोडोंच्या मालमत्तेत फक्त 140 रुपयांमध्ये गुंतवणूक करा; भाड्यातून होणार मोठी कमाई

PPF खात्यात जर एखादा व्यक्ती महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे गुंतवणूक करत असेल तर त्याला जमा रकमेवर पूर्ण महिन्याचे सुद्धा व्याज मिळते. पण जर 5 तारखेनंतर गुंतवणूक करत असाल तर 5 ते 30 तारखे दरम्यान सर्वात कमी बॅलन्सवरच व्याज मिळेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube