युती होणार…, कादाचित दोघांमध्ये कॉलही झाला असेल, खासदार राऊतांनी सांगितली आतली गोष्ट 

Sanjay Raut : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात जोराने

Sanjay Raut

Sanjay Raut

Sanjay Raut : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याची चर्चा होत असून आज माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबात मोठी अपडेट दिली आहे. कादाचित दोघांमध्ये फोन देखील झाले असतील असं खासदार राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.  त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले की,  आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढल आहे. आम्ही सकारात्मक आहोत. राज ठाकरे सकारात्मक आहेत. त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत.  उद्धव ठाकरे अत्यंत सकारात्मक असल्यामुळे जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच मनोमिलन झाल असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचा कारण काय? असं माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले.

तर दुसरीकडे माध्यमांनी अमित ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारले असतान खासदार राऊत म्हणाले की, ही जी संगळ मुलं आहेत, त्यांच्या जन्मापासून हे आधी दोन भाऊ आहे. मी त्या दोघांनाही पाहिले आहे. दहा मिनिटांनी मी राज ठाकरेंना फोन करतोय किंवा उद्धव ठाकरे यांना फोन करतोय, असे सोशल मीडियावर सांगून कोणी एकमेकांना फोन करत नाही. कदाचित फोन झाले सुद्धा असतील, असे त्यांनी म्हटले आहे.

तुम्हाला फळ दिसण्याची मतलब आहे ना फळ झाडावरती यायला आधी बी लावावी लागते, मग पाणी द्यावे लागते, मग वाढवावा लागतो, मग फांद्या येतात अशा अनेक प्रक्रियेतून फळ येत त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. असे देखील यावेळी राऊत म्हणाले.

अमित ठाकरे गोड मुलगा, मी कॅफेमध्ये नाही तर मी घरी जाईल 

तर यावेळी अमित ठाकरे यांनी तुम्हाला शिवतीर्थ कॅफेटेरियावर येण्याचे आमंत्रण दिले आहे असं राऊतांना विचारला असता राऊत म्हणाले की, अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलेले आहे. गोड मुलगा आहे तो. जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे. त्याची विधाने देखील फार गोड आहेत. त्याच्या मनामध्ये ज्या भावना आहेत, त्या भावनेचे मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो. त्यांची विधाने आजकाल फार चांगली आहेत.

रायगडवर पोषक असणाऱ्या गोष्टीच राहणार, माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींचा रायगडकरांना शब्द 

आदित्य देखील भूमिका फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवे आहे? मी कॅफेमध्ये नाही तर मी घरी जाईल. आमच्यासाठी ते कॅफे नाही तर दुसरे घरच आहे. असं माध्यमांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले.

Exit mobile version