Download App

SBI मध्ये मॅनेजरपदासह अन्य 131 पदांसाठी भरती, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

  • Written By: Last Updated:

SBI Recruitment 2024 : तुम्ही देखील देशातील सर्वात मोठी सार्वजनिक स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्य (State Bank of India) नोकरी (Nokri) करण्यासाची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने अनेक रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भरतीशी संबंधित अधिसूचना प्रकाशित करण्यात आली. त्यात या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख यांचे तपशील दिले आहेत.

रणबीरच्या ‘रामायण’मध्ये रामाची एन्ट्री! अरुण गोविल यांच्यामुळे अमिताभ यांचा पत्ता कट? 

स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ने मॅनेजरसह विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 131 पदांसाठी ही भरती आहे. नोकरी मिळण्याची ही मोठी संधी आहे. त्यामुळं उमेदवारांनी संधी न चुकवता अर्ज करावा.

पोस्ट –
स्टेट बँक ऑफ इंडियाने सहा पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
व्यवस्थापक – Manager (क्रेडिट विश्लेषक): 50
सहाय्यक व्यवस्थापक Manager (सुरक्षा विश्लेषक): 23
उपव्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक): 51
व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक): 3
सहाय्यक महाव्यवस्थापक (ॲप्लिकेशन सुरक्षा): 3
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार (CDBA): 1

‘काही गोष्टी पक्षांतर्गत असतात, प्रसिद्धीसाठी नाही’; उमेदवारी मिळताच मेधा कुलकर्णींची पहिली प्रतिक्रिया 

वरील पदांसाठी उमेदवाराचे वय 25 ते 35 वर्षे असावे. निवड प्रक्रियेत निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल आणि त्यानंतर त्यांची या पदांसाठी निवड केली जाईल. नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही असेल.

दरम्यान, या भरीतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी अधिक वेळ न घालवता अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

अर्ज फी –

सामान्य/EWS/OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये आहे तर SC/ST/PWBD उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करायचा?
सुरूवातीला अधिकृत वेबसाईटवर (sbi.co.in) जा.
या पदभरतीविषयीची सविस्तर माहिती घ्या.
यानंतर होमपेजवरील रिक्रूटमेंट ऑप्शनवर क्लिक करा.
या अर्जावर क्लिक केल्यावर एक अर्ज समोर येईल.
त्यात आवश्यक तपशील भरून कागदपत्रे अपलोड करा.
नंतर अर्ज फी भरून त्याची प्रिंट काढा.

 

follow us