‘काही गोष्टी पक्षांतर्गत असतात, प्रसिद्धीसाठी नाही’; उमेदवारी मिळताच मेधा कुलकर्णींची पहिली प्रतिक्रिया
Medha Kulkarni : काही गोष्टी पक्षांतर्गत असतात, प्रसिद्धीसाठी नसतात, मागील अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करण्याचं फळ पक्षाने दिलं असल्याची पहिली प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी दिली आहे. दरम्यान, भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
Valentine Day : सर्वाधिक भारतीय कोणत्या भाषेत देतात प्रेमाची कबुली? उत्तर ऐकूण व्हाल शॉक!
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पक्षाने संधी दिलीयं, माझ्यावर विश्वास दाखवला आणि पुन्हा काम करण्याची संधी दिल्याबद्दल वरिष्ठांप्रती मी मनपूर्वक कृतज्ञ आहे. तीन टर्म नगरसेवक एक टर्म आमदार म्हणून मी काम केलं आहे. आता राज्यसभेत काम करण्याचा वेगळा अनुभव मिळणार आहे. दिल्लीच्या सभागृहात जाण्याची संधी मिळाली असून तिथं पुण्याचे प्रश्न मांडणार सोबतच इतरही जबाबदाऱ्या चांगल्या पार पाडणार असल्याचं मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.
Horoscope Today: धनु राशींचं पैशांचं अनेक दिवसांपासून रखडलेलं काम मार्गी लागेल, दिवस आंनदात जाईल
तुमच्यावर पक्षात अन्याय होत असल्याच्या चर्चा होत्या, त्यावर विचारताच कुलकर्णी म्हणाल्या, माझ्या मनात असं काही नाहीये. काही गोष्टी पक्षांतर्गत असतात. सर्वच गोष्टी प्रसिद्धीच्या नसतात. मलाच आता राज्यसभेच्या उमेदवारीबाबत बातमीमध्ये कळालं आहे. मला पद पाहिजे असं मी कधीच कोणाशी बोलले नाही. मला काम करण्याची संधी हवीयं, एवढचं बोललं होतं. अनेक वर्षांपासून काम करतेयं, त्यामुळे निष्ठेने मी कधी विचलित नाही झाले. त्याचं हे फळ मिळालं असल्याचं कुलकर्णींनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, आज बाकी काही गोष्टी बोलण्याची आवश्यकता नाही. सर्वांना सर्व गोष्टी माहित आहेत. त्यामुळेच हे घडलं आहे. सर्व छान घडत असताना काही बोलण्याची गरज नाही. इतर गोष्टी आज बोलणार नसल्याचंही मेधा कुलकर्णींनी म्हटलं आहे. तसेच वरिष्ठांनी काय विचार करुन मला उमेदवारी दिलीयं त्यावर विचार करण्याचा माझा मुद्दा नाही. उमेदवारी जाहीर होताच अनेकांचे मला फोन येत आहेत. समाजातून सर्वदूर समाधान आहे. इतर समाजालाही माझ्याविषयी जिव्हाळा आहे, काम करताना समाजाचा भाग म्हणून काम कधी केलं नाही. विविध जातीधर्माचे लोकं बहिणीसारखं प्रेम करतात, त्यांचेही मला फोन येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.