Share Bazar : 2023 च्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्याच दिवशी शेअर बाजारानं (stock market)मोठी उसळी घेतल्याची पाहायला मिळाली. आज दिवसभरात बँकिंग, फार्मा आणि एनर्जी समभागांमध्ये झालेल्या खरेदी पाहायला मिळाली. मिड कॅप (Mid cap)आणि स्मॉल कॅप (Small cap)शेअर्समध्ये सुरु असलेली तेजी आजही पाहायला मिळाली. आज BSE चा सेन्सेक्स 230 अंकांच्या उसळीसह 71,336 अंकांवर बंद झाला. तर NSE चा निफ्टी 105 अंकांनी वाढून 21,454 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात तेजी दिसून आल्याने गुंतवणुकदारांच्या (Investors) आशा चांगल्याच पल्लवित झाल्या आहेत.
आज शेअर बाजारातील व्यवहारामध्ये आयटी, मीडिया आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्स वगळता, बहुतेक क्षेत्रांच्या शेअर्समध्ये चांगली गुंतवणूक झाल्याचे पाहायला मिळाली. त्यामध्ये ऑटो, बँकिंग, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स व्यवहाराच्या शेवटी वाढीसह बंद झाले.
Chhagan Bhujbal : महायुतीत समसमान जागावाटप व्हावं, अजितदादा गटाच्या दाव्यानं भाजपची कोंडी?
आज मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये खरेदी वाढल्याने दोन्ही निर्देशांक वाढीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 24 शेअर्स ग्रीनमध्ये तर सहा शेअर्स रेडमध्ये बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 42 शेअर्स वाढीसह आणि 8 घसरणीसह बंद झाल्याचे दिसून आले.
शेअर बाजारानं मोठी उसळी घेतल्याने गुंतवणुकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. BSE वर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 359.08 लाख कोटींवर पोहोचले आहे. ते मागील ट्रेडिंग सत्रामध्ये 356.53 लाख कोटी होते. त्यामुळे आजच्या दिवसभरातील व्यवहारात गुंतवणुकदारांच्या संपत्तीमध्ये जवळपास 2.55 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
आजच्या व्यवहारात एनटीपीसी 2.44 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 1.66 टक्के, टाटा स्टील 1.31 टक्के, एशियन पेंट्स 1.30 टक्के, कोटक महिंद्रा 1.29 टक्के, विप्रो 1.28 टक्के, भारती एअरटेल 1.04 टक्के वाढीसह बंद झाले. बजाज फायनान्स 1.73 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.30 टक्के, इन्फोसिस 1.09 टक्के आणि टीसीएस 0.79 टक्के घसरणीसह बंद झाल्याचे दिसून आले.