Share Market : नवीन वर्षातील तिसऱ्याही दिवशी शेअर बाजारात (stock market)मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारात दुसऱ्या दिवशीही पडझड दिसून आली. सेन्सेक्स 536 अंकांनी घसरून 71,356 वर आला. निफ्टीही 148 अंकांच्या घसरणीसह 21,517 वर बंद झाला. गुंतवणूकदारांकडून विक्रीच्या दबावामुळं शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा सपाटा दिसून आला. त्यामध्ये आयटी (IT)आणि मेटल सेक्टरमधील (Metal sector) शेअर्सची विक्री सर्वाधिक प्रमाणात दिसून आली.
‘राज्यभिषेकानंतर वनवासालाही जावं लागतं’; शिवराज सिंह यांनी खदखद बोलून दाखवली
दुसरीकडं निफ्टीमध्ये टाटा स्टील, हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील आदी शेअर्सला सर्वाधिक फटका बसल्याचे दिसून आले. आजच्या ट्रेडिंग काळात बाजारात जी मोठी घसरण पाहायला मिळाली त्यासाठी सर्वाधिक आयटी आणि मेटल्सचे शेअर्स कारणीभूत आहेत. त्यामधील गुंतवणुकदारांनी जोरदार प्रॉफिट बुक केल्याचे पाहायला मिळाले.
लेट्सअप विश्लेषण : तिसरी बार मोदी सरकार! भाजपचा न डगमगता 400 जागांचा दावा कुणाच्या जोरावर…
आज निफ्टीचा आयटी निर्देशांक 888 अंकांनी घसरला आणि 34,395 अंकांवर बंद झाला. मेटल शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली. त्याचबरोबर ऑटो, कमोडिटी, बँकिंग शेअर्सही घसरणीसह बंद झाले.
दुसरीकडे फार्मा, एफएमसीजी, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, हेल्थकेअर, ऑइल अॅण्ड गॅस आणि कंझ्युमर ड्युरेबल्स सेक्टरच्या शेअर्स वाढीसह बंद झाले. तसेच मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकही हिरव्या रंगात बंद झाल्याचे पाहायला मिळाले.
सेन्सेक्समधील 30 पैकी 10 शेअर्स वाढीसह आणि 20 तोट्यासह बंद झाले. तर निफ्टी 50 पैकी 18 शेअर्स वाढीसह आणि 32 शेअर्स तोट्यासह बंद झाल्याचे पाहायला मिळाले.
आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली असली तरी बीएसईवर लिस्टेड शेअर्सच्या मार्केट कॅपमध्ये अत्यल्प घसरण झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, बाजाराचे मार्केट कॅप 365.10 लाख कोटी रुपयांवर आली आहे. ती मंगळवारी 365.21 लाख कोटी रुपये होती. म्हणजेच आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणुकदारांचं 11 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.