‘राज्यभिषेकानंतर वनवासालाही जावं लागतं’; शिवराज सिंह यांनी खदखद बोलून दाखवली
Shivraj Singh : मध्य प्रदेशात भाजपने एकहाती सत्ता काबिज केल्यानंतर आपले सगळेच पत्ते उघडे केले आहेत. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह (Shivraj Singh) यांच्याऐवजी मोहन यादव (Mohan Yadav) यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान केलं आहे. त्यानंतर आज शिवराज सिंह यांनी निवासस्थान सोडताना आपली खदखद बोलून दाखवली आहे.
मेरे प्यारे बहनों-भाइयों और भांजे-भांजियों,
आप सबसे मेरा रिश्ता प्रेम, विश्वास और अपनत्व का है।पता बदल गया है, लेकिन "मामा का घर" तो मामा का घर है। आपसे भैया और मामा की तरह ही जुड़ा रहूँगा। मेरे घर के दरवाजे सदैव आपके लिए खुले रहेंगे।
आपको जब भी मेरी याद आये या मेरी जरूरत… pic.twitter.com/P9ys9MWzah
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) January 3, 2024
शिवराज सिंह पोस्टमध्ये म्हणाले, “अनेकदा राज्याभिषेक होताना वनवासालाही जावं लागतं, कोणत्यातरी उद्देशासाठी हे घडलं असावं, मात्र काळजी करु नका, माझं जीवन बहिणी, मुलींसाठी जनतेसाठीच आहे. धर्तीवर तुमच्या जीवनातील दुख: कमी करण्यासाठीच आलो असून तुमच्या डोळ्यांत अश्रू ठेवणार नाही. दिवसरात्र मेहनत करणार…” अशी पोस्ट शिवराज सिंह यांनी शेअर केली आहे.
मुंबईतील हॉटेलमध्ये आमिरच्या लेकीचे लग्न, हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींना नको त्या अटी?
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचं श्यामला हिल्स येथील निवासस्थान सोडल्यानंतर शिवराज चव्हाण भोपाळमधील लिंग रोडस्थित निवासस्थानी रहिवासासाठी गेले आहेत. या निवासाला त्यांनी ‘मामा का घर’ असं नाव दिलं आहे. मध्य प्रदेशात शिवराज सिंह ‘मामा’ नावाने लोकप्रिय आहेत.
पुढे चव्हाण पोस्टमध्ये म्हणतात, “मध्य प्रदेशातील जनतेसाठी मी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. नवे मुख्यमंत्री मोहन यादवा यांच्यासह मंत्रिमंडळाला शुभेच्छा… त्यांनी राज्याच्या विकासाला उंचीपर्यंत घेऊन जावं, मी माझ्या आठवणींना सोबत घेऊन आनंदाने परत चाललो आहे. ज्यांनी माझ्या मुख्यमंत्रिपर्यंतच्या प्रवासात मदत केली त्यांना धन्यवाद…” असंही ते म्हणाले आहेत.
पॅलेस्टाईनसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आयसीसीला नडला! भारतीय वीरांनो, तुम्ही कोणासाठी बोलणार का?
तसेच प्रिय बंधू आणि भगीनींनो मी मुख्यमंत्री निवासातून परत चाललो आहे. आज माझा पत्ता बदलणार आहे मात्र, तुमच्या मामांचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमीच उघडे राहणार आहेत. जनतेच्या सेवेचा संकल्प माझ्या नव्या निवासस्थातून सुरु असणार आहे. मामाच्या निवासस्थानी कधीही येऊ शकता, सेवेसाठी कोणतीही कमी पडणरा नाही, असं आश्वासनही शिवराज सिंह यांनी मध्य प्रदेशच्या जनतेला दिलं आहे.
दरम्यान, शिवराज सिंह 2005 , साली खासदार होते. त्यावेळी ते आवंटित इथं निवासास होते. त्यानंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर ते श्यामला हिल्स या निवासस्थानी आले. त्यानंतर 2018 पर्यंत ते याचं ठिकाणी निवासास होते.