पॅलेस्टाईनसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आयसीसीला नडला! भारतीय वीरांनो, तुम्ही कोणासाठी बोलणार का?

पॅलेस्टाईनसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आयसीसीला नडला! भारतीय वीरांनो, तुम्ही कोणासाठी बोलणार का?

Usman Khawaja : भारतातील अनेक प्रसिद्ध क्रिकेटर कोणतीही राजकीय आणि सामाजिक भूमिका घेताना दिसत नाही. पण ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) थेट आयसीसीला नडला आणि लढला. इस्रायल-हमास युद्धावरुन (Israel-Hamas war) ख्वाजाने गाझा आणि पॅलेस्टाईनमधील पीडितांच्या बाजूने नेहमी आवाज उठवला आहे. यावरुन त्याचे आयसीसीसोबतही जोरदार भांडण झाले आहे. आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या संपूर्ण प्रकरणात उडी घेतली आहे.अल्बानीज यांनी या प्रकरणी ख्वाजाचे कौतुक केले आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी ख्वाजाने आयसीसीला विनंती केली होती की त्यांना सामन्यादरम्यान त्याच्या बॅटवर आणि शूजवर ब्लॅक डोव्ह स्टिकर (काळे कबूतर) लावण्याची परवानगी द्यावी. पण आयसीसीने ख्वाजाची ही मागणी फेटाळून लावली होती.

कॅप्टन कमिन्सनेही ख्वाजाला साथ दिली
काळे कबूतर हे पॅलेस्टाईनसारख्या प्रदेशात शांतता आणि स्वातंत्र्याचे प्रतीक असल्याचे मानले जाते. यानंतर ख्वाजाने पर्थ कसोटीत हातावर काळी पट्टी बांधली होती. त्यानंतर आयसीसीने त्याला फटकारले होते आणि भविष्यात असे न करण्याचा सल्ला दिला होता.

14 महिन्यांनंतर रोहित शर्माचे टी-20 मध्ये पुनरागमन? अशी होणार भारत-अफगाणिस्तान सीरीज

या संपूर्ण प्रकरणामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सही उतरला होता. त्याने सहकारी खेळाडू उस्मान ख्वाजाचे समर्थन केले आणि म्हटले की गाझामधील मानवाधिकार संकटाकडे लक्ष वेधण्याचा ख्वाजाचा प्रयत्न आक्षेपार्ह नव्हता. पण आता ऑस्ट्रेलियाचे पीएम अल्बानीज यांनीही या संपूर्ण प्रकरणात लक्ष घातले आहे.

ख्वाजाच्या धाडसाचे पंतप्रधानांनी कौतुक केले
सिडनी कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघांना संबोधित करताना अल्बानीज यांनी ख्वाजाचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, मानवी मूल्यांसाठी उभे राहण्याचे धाडस दाखविल्याबद्दल मी ख्वाजा यांचे अभिनंदन करतो. त्याने धैर्य दाखवले आणि संघाने त्याला साथ दिली ही खूप चांगली गोष्ट आहे.

Japan Earthquake: भूकंपात अडकलेल्या भारतीय अभिनेत्याची तब्बल 18 तासांनी सुटका

ख्वाजा मूळचा पाकिस्तानचा आहे
आयसीसीच्या नियमांनुसार, क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान कोणत्याही प्रकारच्या राजकीय, धार्मिक किंवा वर्णद्वेषाचा प्रचार करू शकत नाहीत. दरम्यान उस्मान ख्वाजा मूळचा पाकिस्तानचा आहे. त्यांचा जन्म 18 डिसेंबर 1986 रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे झाला. वयाच्या पाचव्या वर्षी उस्मान ख्वाजा आपल्या पालकांसह ऑस्ट्रेलियाला गेला.

Soonu Sud बनला दिव्यांगांचा दूत; सरकारकडे पेन्शनवाढीची मागणी

उस्मान ख्वाजाचे वडील तारिक हे पाकिस्तानातील क्लब क्रिकेटर होते, त्यामुळे ख्वाजाचा या खेळाकडे कल असणे स्वाभाविक होते. आतापर्यंत ख्वाजाने ऑस्ट्रेलियासाठी 67 कसोटी, 40 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. ख्वाजा आता 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात खेळताना दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube