Download App

‘भेटवस्तू नको, फक्त Google Pay करा’, शर्माचींजी मुलगी अन् गोपालजींच्या मुलाची लग्नपत्रिका व्हायरल

  • Written By: Last Updated:

Viral Wedding Card: सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे. लग्नात पाहुण्यांना दिली जाणारी लग्नपत्रिका (Wedding Card) खूप महत्त्वाची असते. कधी लग्नपत्रिकाच विचित्र असते तर कधी त्यातील मजकूर. अशा कितीतरी लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यात. यात आता आणखी एका लग्नपत्रिकेची भर पडलीये. सध्या सोशल मीडियावर एक पत्रिका (Viral Wedding Card) व्हायरल होतेय, ही पत्रिका पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

‘…तोपर्यंत धार्मिक स्थळांशी संबंधित नवीन खटला दाखल होणार नाही’, सर्वोच्च न्यायालय 

लग्नपत्रिकेवर वधू आणि वरासह विवाह सोहळ्याचे इतर तपशील दिलेले असतात. पाहुण्यांसाठी काही खास टीप असतात. यामध्ये कृपया आहेर आणू नये, किंवा आहेर स्वीकारला जाणार नाही, अशा आशयाच्या टीप्स असतात. मात्र, या व्हायरल लग्न पत्रिकेत केवळ टोमणे मारलेले दिसतात. कृपया कोणत्याही भेटवस्तू नाहीत, फक्त Google Pay किंवा रोख द्या, कारण जोडप्याला आधीच 7 डिनर सेट आणि 20 फोटो फ्रेम मिळाल्या आहेत.

शर्माजींची मुलगी गोपालजींच्या मुलाशी लग्न करतेय, ही पंच लाईन सर्वांचे लक्ष वेधून घेतेय. या व्हायरल कार्डमध्ये लिहिले आहे की, ‘आमच्या लग्नात तुमची उपस्थिती खूप गरजेची आहे, कारण तुम्ही आला नाही तर आमच्या लग्नातील जेवणाची तक्रार कोण करणार?, असा खोचक टोला पाहुण्यांना लगावला आहे.

… तेव्हा अटलजी काय म्हणतील या भीतीने मी खूप घाबरलो, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा 

कार्डमध्ये वधूची ओळख करून देताना ‘अभ्यासात हुशार’ असे लिहिले आहे. तर मुलगा ‘बी-टेक केल्यावर दुकान सांभाळतो’, असं मुलाच्या कौतुकात लिहिलं. यासोबत लग्नाच्या ठिकाणाचा पत्ता असा लिहिला आहे – गेल्या वर्षी दुबेजींची निवृत्ती जिथं झाली होती, त्याच ठिकाणी लग्न आहे.

5 जानेवारीला होणाऱ्या या लग्नाच्या कार्डमध्ये खाली लिहिले आहे.. ‘तीन पंडितांनी हा दिवस ठरवला आहे, टिंकूच्या परीक्षाही या दिवशी संपत आहेत.

पोस्टमध्ये रिसेप्शनचे आमंत्रण देखील समाविष्ट आहे, लग्नाचा हँगओव्हर अद्याप संपलेला नाही, रिसेप्शनचे नाटक पाहण्यासाठी या.

रिसेप्शनसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे देखील नमूद केलीत. त्यात लिहिलं की, कृपया आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवा, इतका महाग स्टेज त्यांचे खेळाचे मैदान नाही. सर्वात आनंददायक गोष्ट म्हणजे: जेवल्यानंतर जा, पण एकदाच – दर आहे 2,000 रुपये प्रति प्लेट आहे, यार.

दरम्यान, या लग्नपत्रिकेवर अनेक युजर्संनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केलाय. ही पत्रिका तुफान व्हायलर होत आहे.

follow us