Download App

सावधान! बिस्कीटांचं सेवन ठरतंय घातक; जाणून घ्या, बिस्कीटांचे दुष्परिणाम

तुम्ही इतक्या आवडीनं जी बिस्कीटं खाताय ती तुमच्या शरीराला नुकसानकारक ठरत आहेत.

Side Effects of Biscuits : चहाचा कप असो किंवा ऑफिसमध्ये भूक भागवण्याचा सोपा पर्याय असो बिस्किटे जवळजवळ प्रत्येकाच्या घरात असतातच. मुले असोत किंवा मोठी माणसं सर्वांनाच कुरकुरीत आणि गोड बिस्किटे आवडतात आणि खावीशी वाटतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही इतक्या आवडीनं जी बिस्कीटं खाताय ती तुमच्या शरीराला नुकसानकारक ठरत आहेत. बिस्किटांकडे बहुतेकदा हलक्या आणि सोयीस्कर नाश्त्याचा पर्याय म्हणून पाहिले जाते. परंतु तज्ज्ञांच्या मते ते तुमच्या आरोग्यासाठी ‘गोड विष’ ठरू शकतात. डॉ. बिमल छाचर यांच्या मते बिस्किटांमध्ये वापरले जाणारे मैदा, साखर आणि हायड्रोजनेटेड तेल शरीरातील चयापचय क्रियांना बिघडवू शकते.

पचनावर परिणाम

बिस्किटांमध्ये मैदा आणि कमी फायबर असणारे घटक असल्याने बिस्किटं पोटात सहज पचत नाहीत. त्यांच्या सततच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लपित्त यांसारख्या समस्यांचा त्रास होऊ शकतो.

वजन वाढण्याचा धोका

बिस्किटांमध्ये लपलेल्या कॅलरीज आणि साखर यांची हळूहळू शरीरात चरबीच्या रूपात साठवणूक होऊ लागते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी बिस्किटे खाणे अजिबात योग्य नाही.

सावधान! स्मोकिंग न करताही होतोय ‘हा’ कॅन्सर, अहवालाने वाढली धाकधूक; वाचा सविस्तर..

रक्तातील साखरेवर परिणाम

बिस्किटांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी बिस्किटांपासून दूर राहावे. बिस्किटे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवू शकतात.

हार्मोनल असंतुलन

डॉ. छाचर यांच्या मते बिस्किटांमध्ये असलेले ट्रान्स फॅट आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण करू शकतात. विशेषतः महिलांमध्ये यामुळे मुरुमे, अनियमित मासिक पाळी आणि थकवा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

मुलांच्या वाढीवर परिणाम

मुलांना अनेकदा बिस्किटे दिली जातात आणि बिस्किटे खाण्याची सवयही लावली जाते. परंतु त्यामध्ये प्रथिने, फायबर किंवा आवश्यक जीवनसत्त्वे यांचे प्रमाण खूप कमी असते. याचा थेट परिणाम मुलांच्या वाढीवर नकारात्मक पद्धतीने होऊ शकतो. यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होऊ शकते. बिस्किटे खाण्यास जितकी निरुपद्रवी वाटतात तितकीच शरीरावर धोकादायक परिणाम देखील करू शकतात. त्यामुळे आता बिस्किटांना अजून आरोग्यदायी पर्याय शोधण्याची वेळ आली आहे.

झोपेचा अभाव आरोग्यासाठीच नाही तर नातेसंबंधांसाठीही हानिकारक! ‘इतक्या’ तासांची झोप आवश्यकच

follow us