Side Effects of Drinking Excess Water : पाणी आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचे मानले जाते. पाणी पिण्याने केवळ तहान भागत नाही तर शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. परंतु गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे, (Health Tips) तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जास्त पाणी पिण्याचे तोटे देखील (Side Effects of Drinking Excess Water) आहेत, त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या.
आपले मूत्रपिंड पाणी फिल्टर करतात आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने मूत्रपिंडांवर भार पडतो. त्यांना काम करणे कठीण होते. सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. जास्त पाणी प्यायल्याने हे इलेक्ट्रोलाइट्स पातळ होतात. ज्यामुळे स्नायूंमध्ये पेटके आणि अशक्तपणा येतो. पाण्याचा अतिरेक आणि अभाव दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.
पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो, तर आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिल्याने ओव्हरहायड्रेशन होऊ शकते. खेळाडूंना विशेषतः या समस्येचा जास्त त्रास होतो. कमी पाणी पिल्याने स्नायूंमध्ये पेटके येऊ शकतात, तर जास्त पाणी पिल्याने रक्ताची जाडी कमी होते.
तज्ज्ञांच्या मते, तहान भागवण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी प्यावे. विशेषतः जर तुम्हाला तहान लागली नसेल तर जबरदस्तीने पाणी पिणे योग्य नाही. जास्त पाणी पिण्यामुळे चक्कर येणे, अस्वस्थता आणि कधीकधी हृदयाचे ठोके देखील वाढू शकतात. पण याचा अर्थ असा नाही की, कमी पाणी प्यावे. अल्कोहोल वगळता, आपण वापरत असलेल्या प्रत्येक द्रवात काही प्रमाणात पाणी असते.
शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित असलं पाहिजं, परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त नसावे. तहान लागणे हे शरीराला पाण्याची गरज असल्याचे लक्षण आहे, म्हणून जेव्हा गरज वाटेल तेव्हाच पाणी प्या. वारंवार जबरदस्तीने पाणी पिण्याची गरज नाही. लघवीच्या रंगावरूनही पाण्याच्या कमतरतेचा अंदाज लावता येतो. जर लघवीचा रंग गडद असेल तर ते शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे लक्षण आहे. तथापि, ते बरे करण्यासाठी जास्त पाणी पिणे योग्य नाही. हलक्या पिवळ्या रंगाची लघवी सामान्य मानली जाते.