Smartphone Harming Your Heart : आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन (Smartphone) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यावर सर्वात आधी फोन तपासणे, दिवसभर नोटिफिकेशन्सचा पाठलाग करणे (Health Tips) आणि रात्री उशिरापर्यंत स्क्रीनवर स्क्रोल करणे, हे सर्व आता सर्वसामान्य सवयी झाल्या आहेत. पण या तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर आणि एकूणच आरोग्यावर नकारात्मक परिणाम (Smartphone Harming Your Heart) होऊ शकतो, असा गंभीर इशारा अलीकडील संशोधन अहवाल आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
हृदयावर होणारा परिणाम
संशोधनानुसार, दीर्घकाळ स्मार्टफोन वापरल्याने शरीरातील ताणतणावाची पातळी वाढते. हा ताण हृदयाचे ठोके अनियमित करतो. हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका वाढवतो. विशेषत: नोमोफोबिया (Nomophobia) म्हणजेच मोबाईलपासून दूर असताना भीती किंवा अस्वस्थता जाणवणे. ही मानसिक अवस्था थेट मज्जासंस्थेला ताण देते. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, अनियमित होतात आणि दीर्घकाळ ही स्थिती राहिल्यास हृदयरोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. याशिवाय, स्मार्टफोनमधून निघणारा निळा प्रकाश (Blue Light) झोपेची गुणवत्ता कमी करतो, जी हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
‘साकळाई’ला महिनाभरात प्रशासकीय मान्यता अन् भूमिपूजन; सुजय विखेंनी सांगितला प्लॅन, लकेंनाही टोला
स्मार्टफोन अन् ताण यांचा संबंध
– सतत स्क्रीनकडे पाहणे, सोशल मीडियावरील तुलना, आणि प्रत्येक क्षणी ऑनलाइन राहण्याची अस्वस्थता – हे सर्व मानसिक शांतता भंग करणारे घटक आहेत.
– या मानसिक ताणामुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतात.
– हृदय आणि रक्तवाहिनीसंबंधी प्रणालीवर ताण येणे
– मेंदू सतत तणावग्रस्त असल्यास हृदयाची गती दीर्घकाळ जास्त राहते.
‘गांधी’ मालिकेचा वर्ल्ड प्रीमियर TIFF 2025 मध्ये! पहिली भारतीय मालिका म्हणून ऐतिहासिक बहुमान
युरोपमधील एका अभ्यासात आढळले की, जे लोक दिवसाला 5 तासांहून अधिक स्मार्टफोन वापरतात, त्यांची Heart Rate Variability (HRV) कमी होते. HRV कमी होणे म्हणजे हृदयाच्या आरोग्यासाठी नकारात्मक संकेत. अमेरिकेतील एका कार्डिओलॉजी परिषदेत तज्ज्ञांनी सांगितले की, तरुण पिढीत डिजिटल ताणामुळे हृदयरोगांचा धोका झपाट्याने वाढत आहे.
हृदयाचे रक्षण करण्यासाठी उपाय
– फोन वापरण्याची वेळ मर्यादित ठेवा – दिवसात ठरावीक तासच वापर.
– झोपण्यापूर्वी फोन वापरणे टाळा – किमान 1 तास आधी फोन बाजूला ठेवा.
– स्क्रीन ब्रेक घ्या – प्रत्येक 30-40 मिनिटांनी 5 मिनिटांचा ब्रेक घ्या.
– शारीरिक हालचाल वाढवा – चालणे, व्यायाम, योगा दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करा.
– सोशल मीडिया डिटॉक्स – आठवड्यातून किमान एक दिवस फोनपासून पूर्णपणे दूर राहा.