Apple Intelligence : जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय मोबाईल कंपनी असलेली ॲपलचे (Apple) सीईओ (CEO) टिम कुक (Tim Cook) यांनी WWDC 2024 च्या एका मुलाखतीमध्ये स्वीकारले आहे की, स्मार्टफोनचे व्यसन ही एक समस्या आहे. मात्र त्यांनी यावर एक AI उपाय देखील सुचवलेले आहे.
WWDC 2024 च्या मुलाखतीदरम्यान MKBHD म्हणून प्रसिद्ध असलेल्या YouTuber मार्क्स ब्राउनलीने (Marks Brownlee) ॲपलचे सीईओ टिम कुक यांना AI लोकांना त्यांच्या फोनवर कमी वेळ घालवण्यास मदत करू शकते? असा प्रश्न विचारला होता यावर उत्तर देत टिम कुक म्हणाले, आज अनेक लोकांना स्मार्टफोनचे व्यसन आहे मात्र Apple ने त्याच्या OS सूटमध्ये नवीन AI फीचर्स “Apple Intelligence” आणले आहे जे यूजर्सना फोन कमी वापरण्यास मदत करतो. या फीचर्सच्या मदतीने यूजर्स अधिक स्मार्ट बनते आणि फोनवर कमी वेळेत जास्त काम करू शकतात.
काय आहे Apple Intelligence
नुकतंच ॲपलने WWDC 2024 मध्ये Apple Intelligence नावाचे AI टूल लाँच केले आहे. हे नवीन टूल iPhone, iPad आणि Mac मध्ये सपोर्ट करणार आहे. Apple Intelligence ॲपलचे एक नवीन टूल आहे जे Chat GPT च्या मदतीने तयार करण्यात आले आहे. हे AI टूल सिरीसोबतही काम करणार आहे. यामुळे आता सिरी इंटरनेटशिवाय देखील काम करू शकणार आहे. ज्यामध्ये अलार्म सेट करणे, कॉल करणे, म्युझिक प्ले करणे आणि मेसेज पाठवणे यासारख्या कामाचा समावेश आहे.
या AI टूलच्या मदतीने यूजर्सला iOS 18 मध्ये खास ‘रायटिंग टूल्स’ प्रदान करण्यात येणार आहे. ज्याच्या फायदा घेत यूज़र्सला प्रूफरीडिंग, मेसेजला थोडक्यात लिहिण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय, यात ऍपलच्या मेल, पेजेस, नोट्स सारख्या फर्स्ट पार्टी ॲप्समध्ये एकत्रीकरण करण्याची सुविधा असेल.
‘वी आर डाउन बट नॉट आऊट’, विजय संकल्प मेळाव्यातून फडणवीसांनी लावला विरोधकांना टोला
तसेच Apple Intelligence टूलमध्ये यूजर्सला इमेज प्लेबॅकग्राउंड फीचरचा लाभ घेता येणार आहे. या फिचरच्या मदतीने यूजर्स ॲनिमेटेड, इलस्ट्रेटेड आणि स्केच केलेल्या इमेज सहज तयार करू शकणार आहे. ज्यामध्ये तुम्ही Prompt टाकाल आणि इमेज तयार होईल.